
सावधान! Tinder गर्लचा स्कॅम, दोन तासाच्या डेटसाठी बील किती पाहा…
मुंबई : एकटेपणा दूर करण्यासाठी अनेक फोन, मेसेजेस येत असतात. अनेकजण लोक हल्ली डेटिंग ॲपचा वापर करतात. मात्र टिंडर या डेटिंग या ॲपवर ओळख झालेल्या युवतींच्या मदतीने गंडा घालविण्याचे प्रकार समोर आला असून, अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.
मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरात असलेल्या द रेड रूम आणि गॉड फादर नावाच्या हॉटेलमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. टिंडर या ॲपच्या माध्यमातून ओळख झालेली युवती ही युवकांना द रेड रूम किंवा गॉडफायदार सारख्या हॉटेलमध्ये भेटायला बोलावते. त्या ठिकाणी अवघ्या तास दोन तासातच महागडे पेय किंवा खाद्यपदार्थ ऑर्डर करून खाऊन पिऊन झाल्यावर काहीतरी कारण सांगून हळूच निघून जाते. हॉटेलचे आलेले किमान 45 ते 50 ते 60 हजाराचे बिल मात्र पीडिताच्या खिशातून हॉटेल मॅनेजमेंट आणि त्या ठिकाणी असणारे बाऊन्सर वसूल करत आहेत.
टिंडर ॲपवर ओळख झालेल्या युवतीचा मोबाईल नंतर लागत नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच काही युवकांनी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर या संदर्भात तक्रारी नोंदवल्या आहेत. सध्या याप्रकरणी आंबोली पोलिसांकडून ते ॲप कोण ऑपरेट करत आहे? त्यात कोणकोणत्या मुली सहभागी आहेत? आणि हॉटेलचा नेमका रोल काय याचा तपास करत आहेत.
दरम्यान, भारतात Tinder, Bumble, Badoo, woo सारख्या अॅप्सची लोकप्रियता प्रचंड आहे. Tinder हे Dating App भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. या Dating सर्विसला वर्ष 2012 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि हे 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…
‘कॉल गर्ल’च्या नावाने फोन करून युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या…
IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…
आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…
‘गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठक हिच्या दांडियाचे पास अन् लाखो रुपयांची फसवणूक…
मोबाईलवर बनावट स्क्रीनशॉट दाखवून बंटी-बबली करायचे फसवणूक…

