
वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स अंतर्गत गुणगौरव समारंभ सोहळा संपन्न…
पुणे : गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी, युनिक इंटरनॅशनल स्कूल आणि पोलिस काका न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स अंतर्गत भव्य गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला.
सुनील सांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली वय वर्ष ३ ते १३ गटातील मुला-मुलींनी सलग १ तास ११ मिनिटे ११ सेकंद प्रात्यक्षिक सादर करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. समर्थ पोलिस लाईन, न्यू मिलेनियम स्कूल आणि युनिक इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथे पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते संपन्न झाला.
या वेळी विवेक पांडे (जनरल सेक्रेटरी, वर्ल्ड रेकॉर्ड एक्सलन्स), दत्तात्रय कोबरणे (संस्थापक अध्यक्ष, युनिक इंटरनॅशनल स्कूल), पुनम पवार (व्हॉइस प्रिन्सिपल,) प्रिषिता पांडे (संगीत विशारद), इनायत मुजावर (प्रिन्सिपल, न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल), संदीप कद्रे (उपसंपादक, पोलिस काका), डॉ. महेश बुलाख आणि पालकांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.
कार्यक्रमात छोट्या चिमुरड्यांनी थरारक व शिस्तबद्ध प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पालक, शाळा प्रशासन आणि सर्व मान्यवरांकडून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. या विक्रमात एकूण १२९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यामध्ये ५४ मुले आणि ७५ मुली सहभागी झाल्या. विशेष म्हणजे मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात असून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. संपूर्ण स्तरातून सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
समर्थ पोलिस लाईन येथील विद्यार्थ्यांचे सिलंबम स्पर्धेत घवघवीत यश…

