
UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट IPS पदापर्यंत मजल मारली अन् अटक झाली…
हैद्राबाद: एका महिला ट्रेनी IPS अधिकाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी ट्रेनी IPS अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. यामुळे खाकी वर्दी घालून देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका ट्रेनी IPS अधिकाऱ्याचे करियर सुरू होण्याआधीच त्याला अटक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित ट्रेनी अधिकाऱ्यावर आपल्या सोबत प्रशिक्षण घेणाऱ्या
उदय कृष्णा रेड्डी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी अधिकाऱ्याचे नाव असून तो मूळचा आंध्र प्रदेशचा आहे. IPS होण्यापूर्वी तो आंध्र प्रदेश पोलिस दलात सामान्य कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. नोकरी करत असतानाच त्याने अहोरात्र मेहनत केली. UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याने थेट IPS पदापर्यंत मजल मारली. आपल्या या ‘कॉन्स्टेबल ते IPS’ संघर्षाचा प्रवास त्याने २०२५ च्या मध्यभागी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ती पोस्ट पाहून ३० वर्षीय पीडित महिला अधिकाऱ्याने त्याचे कौतुक करण्यासाठी मेसेज केला. या पहिल्या मेसेजपासून दोघांमध्ये संवाद सुरू झाला. पुढे या संवादाचे रूपांतर मैत्रीत झाले आणि वादही झाला.
View this post on Instagram
आरोपी महिला अधिकाऱ्यावर सतत संशय घ्यायचा. रागाच्या भरात तिचे लॅपटॉप आणि फोन फोडून टाकायचा. तिने त्याचे म्हणणे ऐकले नाही, तर तो स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी द्यायचा आणि तिला ब्लॅकमेल करायचा. या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला महिला अधिकारी कंटाळली होती. अखेर तिने त्याच्यासोबतचे सर्व नातेसंबंध तोडून टाकले. काही काळाने तिने दुसऱ्या व्यक्तीशी विवाह केला आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली.
आपल्याला सोडून दुसऱ्याशी लग्न केल्यामुळे आरोपीचा इगो प्रचंड दुखावला गेला होता. लग्नानंतरही तो तिचा पाठलाग करत होता. अकॅडमीत असताना आरोपीने महिला अधिकाऱ्याच्या नकळत तिचे काही खासगी व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड केले होते. तिचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आरोपीने ते व्हिडिओ थेट तिच्या पतीच्या मोबाईलवर पाठवले. व्हिडिओ पाठवून तो तिला सतत ब्लॅकमेल करत राहिला आणि मानसिक त्रास देत राहिला. यानंतर तिने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तिची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत तिच्या मानेवर गळा आवळल्याचे वळ आणि शरीरावर दुखापतीच्या खुणा स्पष्ट आढळल्या. या वैद्यकीय अहवालामुळे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.
अट्टापूर पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्याला तात्काळ ताब्यात घेतले. सुरुवातीला या प्रकरणात साध्या कलमांखाली गुन्हा नोंदवला होता. पण वैद्यकीय अहवाल आणि पीडितेच्या सविस्तर जबाबा नंतर पोलिसांनी अत्यंत कठोर कलमे लावली आहेत. त्याच्याविरोधात बलात्कारासह हत्येचा प्रयत्न अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची रवानगी आता चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर आरोप; कंडोम फेकले अन्…
महिला IPSचे अश्लील Video काढून पतीला पाठवल्याचा गंभीर आरोप अन् आत्महत्येचा प्रयत्न…
महाराष्ट्राचे सुपूत्र IPS विनायक भोसले यांच्या उत्तर प्रदेशात धडाकेबाज कारवाया…
महाराष्ट्रातील सुपुत्र अखेरच्या प्रयत्नात झाला IPS अन् दिला राजीनामा…
जिद्दीच्या जोरावर बनला IPS; गावकऱ्यांनी काढली चक्क हत्तीवरून मिरवणूक…
IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना IPS अधिकाऱ्याची आत्महत्या…
Ex IPS शिवदीप लांडे यांची नवी इनिंग सुरू…

