मेकॅनिक प्रियकराने बँक कर्मचारी प्रेयसीचा घेतला जीव…

इंदूर (मध्य प्रदेश) : बँकेची कर्मचारी पलक हिच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर मयंक शाक्य याला अटक केली आहे. मध्य प्रदेशातील खजराणा भागात हा प्रकार घडल्यानंतर खळबळ उडाली होती. पण, पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

आरोपी मयंक हा पलकवर लग्नासाठी दबाव टाकत होता. मात्र, तिने नकार दिल्यावर त्याने तिला मारहाण केली. नंतर तिचा गळा आवळून खून केला. ही घटना अपघात असल्याचा भास निर्माण करण्यासाठी त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. मृतदेह स्वयंपाकघरात सोडून त्याने घटनास्थळावरुन पळ काढला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलक केशव (वय २६) ही मूळची हरदा जिल्ह्यातील टिमरणी येथील रहिवासी होती. ती इंदूरमधील तपेश्वरी बाग कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होती. ती आयसीआयसीआय बँकेत नोकरी करत होती. रविवारी रात्री अर्धवट जळालेला मृतदेह किचनमध्ये आढळून आला होता. स्वयंपाक करताना आग लागून तिचा मृत्यू झाल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसत होते. गॅस शेगडीचा बर्नर वेगळा झाला होता, गॅस गळती होत होती आणि शेगडीवर चिरलेल्या भाज्या ठेवलेल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीला हा अपघात असावा असे समजून तपास सुरु करण्यात आला होता.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले तेव्हा या प्रकरणाला वेगळं वळण लागले. फुटेजमध्ये एक युवक चेहऱ्यावर कापड बांधून घाईघाईने बाहेर पडताना दिसला; त्याच्या पाठीवर एक बॅगही होती. त्यानंतर सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि लोकेशन डेटाचे विश्लेषण केले. या तपासामुळे मयंक शाक्य याची ओळख पटली. घटनेच्या वेळी त्याचे लोकेशन खजराणा भागात असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने डबरा येथे छापा टाकून आरोपीला अटक केली.

चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. पोलिस ठाण्याचे प्रभारी मनोज सिंग सेंधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक कुलर दुरुस्तीचे काम करतो. दोघांची भेट साधारण सहा वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि ते सतत एकमेकांच्या संपर्कात होते. मयंकला पलकशी लग्न करायचे होते, परंतु तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी हा प्रस्ताव नाकारला होता; तिचे कुटुंबीय तिच्यासाठी अन्यत्र योग्य जोडीदार शोधत होते. या गोष्टीचा राग आल्याने मयंकने तिला मारण्याचा कट रचला आणि पेट्रोलची बाटली घेऊन तिच्या घरी पोहोचला. दोघांमध्ये वाद झाला. त्यादरम्यान मयंकने पलकला जमिनीवर पाडून तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर ही घटना एक अपघात असल्याचे भासवण्याच्या उद्देशाने त्याने तिच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून त्याला आग लावली आणि घटनास्थळावरुन पळ काढला. पलक हिचे वडील राधेश्याम यांनी तिला वारंवार फोन करूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांनी घरमालकाला तिची विचारपूस करण्यास सांगितले. घरात प्रवेश केल्यावर घरमालकाला पलकचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता.

प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा म्हशीच्या गोठ्यात आवळला गळा अन्…

पुणे! प्रियकराने चार मित्रांच्या हवाली केलं मैत्रिणीला अन् कधी लॉज तर कधी…

नाशिक! वैष्णवी आवारे हत्येचा उलगडा; प्रियकराला दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग…

प्रियकराच्या सांगण्यावरून नर्सने केला नवऱ्याचा सलाईनमधून क्रुर मर्डर…

सांगली! प्रेमविवाहानंतर रात्रीच्या सुमारास दुसऱ्या प्रियकराला घरी बोलवलं अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!