
अधिकाऱ्याला लाखो रुपयांची लाच घेतलेल्या रंगेहात पकडलं; घरात मिळालं घबाड…
नांदेड : बीड येथील लाचखोर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड याच्या नांदेड येथील निवासस्थानी एसीबीने झाडाझडती घेतली. त्याच्या घरात एसीबीच्या पथकाला एक लाख सात हजार रूपये रोख, तीन तोळे सोने आणि शेत जमिनीची कागदपत्रे आढळली आहेत.
बीड जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या निधी वितरणासाठी आणि फाईलवर सही करण्यासाठी तब्बल ४५ लाखांची लाच स्वीकारताना विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवाड याला ३१ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. लखमवाड याच्या नांदेडमधील घरातून एक लाख सात हजार रोख रक्कम, सोने आणि दहा एकर शेतीची कागदपत्रे एसीबीच्या पथकाने जप्त केली.
View this post on Instagram
नांदेड शहरातील आनंद नगर भागात त्याचे वडिलोपार्जित घर आहे. याच घरी काल रात्री नांदेड एसीबीने झाडाझडती घेतली. रात्री अडीच वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. लाच प्रकरणात मोठा अधिकारी अटक झाल्यानंतर, त्यांनी शासकीय नोकरीतून जमवलेली अपसंपदा जप्त करण्यासाठी त्याच्या घरी तपासणी, झाडाझडती घेतली जाते. एसीबीच्या कारवाईची ही प्रक्रिया आहे. त्यानुसार श्रीनिवास लखमावाड याच्या नांदेड येथील निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली, असे नांदेड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राहुल करकसे यांनी सांगितले.
‘डॉन’च्या आलिशान बंगल्यावर धाड अन् मिळालं मोठं घबाड…
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड; मिळालं भलं मोठं घबाड…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात मिळालं घबाड…
अभियंत्याच्या घरावर धाड टाकताच मिळालं मोठं घबाड…

