पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले; ग्रामस्थांनी सांगितले…

पुणे : पुणे जिल्ह्यातील पौड तालुक्यात आज (शनिवार) दुपारच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.

मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथे ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचे AW 139 या नावाचे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाले आहेत. हॉटेल गारवा लागत शेतात हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर गावातील लोक आणि गारवा हॉटेलचे मालक आणि कर्मचारी मदतीला धावून आले आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर जुहू मुंबई येथून हैदराबाद जात होते. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टरचे कॅप्टन आनंद हे जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर, दिर भाटिया, अमरदीप सिंग, एस पी राम हे जखमी झाले आहे. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुण्यातील पौड या गावाजवळ एका शेतात हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हे हेलिकॉप्टर एका खासगी कंपनीचं आहे. मुंबईहून ते हैदाराबादला जात होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती पुणे जिल्ह्यातचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

ग्रामस्थांनी सांगितले की, हेलिकॉप्टर काही कळायच्या आता ते शेतामध्ये कोसळले. आम्ही पळत जाऊन हेलिकॉप्टरजवळ पोहोचलो त्यावेळी पायलट शुद्धीवर होता. आम्ही सर्वांना बाहेर काढले. ते आम्हाला सांगत होते, येथून लगेच दूर चला, कधीही स्फोट होऊ शकतो. मग आम्ही सगळे दूर पळालो.’

Video: पुणे ग्रामीण पोलिस दलाची दमदार कामगिरी…

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

नेपाळमध्ये जळगावच्या पर्यटकांची बस नदीत कोसळली; पाहा अपघातग्रस्तांची नावे…

Video: ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!