Fastag चा बदलला नियम; तर भरावा लागेल दुप्पट टोल…

मुंबई : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI ने Fastag बाबत एक नवीन नियम लागू केला आहे. याअंतर्गत ज्यांच्या वाहनांमध्ये फास्टॅग नाही त्यांच्याकडून दुप्पट टोल आकारला जाणार आहे. यासंदर्भात NHAI कडून निवेदन जारी करण्यात आले आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

महामार्गावरून प्रवास करत असताना अनेकजण वाहनाच्या काचेला Fastag लावत नाहीत. त्यांच्यामुळे इतर वाहनांचा वेळ जातो. त्यांना या सूचना देण्यात आला आहेत. कार किंवा इतर वाहनांच्या विंडस्क्रीनवर जाणूनबुजून फास्टॅग चिकटवत नाहीत, यावर कठोर कारवाई करण्यासाठी NHAI ने फास्टॅग संदर्भात नवीन नियम लागू केला आहे. आता जाणूनबुजून विंडस्क्रीनवर फास्टॅग न लावणाऱ्यांकडून अधिक कर वसूल केला जाईल.

NHAI ने या संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, विंडस्क्रीनवर फास्टॅग न लावल्याने टोल प्लाझावर खूप वेळ जातो. रांगेत उभ्या असलेल्या इतर वाहनांना त्रास होतो. या संदर्भात प्राधिकरणाने एसओपी जारी केला असून त्याअंतर्गत आता अशा वाहनचालकांकडून दुप्पट टोल टॅक्स वसूल केला जाईल. नियमाचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.


पोलिसकाका Video News: १९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…

वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…

पुणे पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेणार गुगलची मदत…

ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा इशारा; थेट लायसन्स होणार रद्द…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!