
प्रेयसीच्या साखरपुड्यानंतर नवऱ्याच्या घराच्या गेटला लावली बॉम्बसदृश वस्तू अन् पुढे…
वर्धा : एका घरासमोरील गेटला बॉम्बसदृश वस्तू अडकवली असल्याचे दिसून आल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॉम्बसदृश्य वस्तू तिचं वायर कापून निकामी केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या घटनेने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली. प्रेम प्रकरणातून हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. आर्वीच्या विठ्ठल वॉर्डमध्ये ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आर्वीच्या विठ्ठल वार्डमध्ये वंदना ज्ञानेश्वर कारमोरे यांच्या घराच्या गेटलाच ही वस्तू पिशवीत घालून आडकवली होती. या वस्तूसोबतच एक पिशवीत आणि एक बाहेर अशा दोन चिठ्ठ्या आढळून आल्या. पिशवीला हात लावू नका अन्यथा मोठा स्फोट होईल असे या चिठ्ठीत लिहीले होते. पहाटे साफसफाई करत असलेल्या एका युवतीच्या हा प्रकार लक्षात आला. तीने या घटनेची माहिती वंदना कारमोरे यांना दिली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वायर कापून संबंधित बॉम्बसदृश वस्तू निकामी केली. या पिशवीमध्ये असलेल्या बॉम्बसदृश वस्तूला एक टायमर देखील जोडण्यात आला होता. त्या टायमरवर 7: 21 वेळ सेट करण्यात आला होता. त्याला लागूनच एक बॅटरी देखील जोडण्यात आली होती. यामध्ये विविध रसायणांचे मिश्रण असलेले एक सर्किट होते, यासाठी आगकाड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गुलाचा उपयोग करण्यात आला होता. ही बॉम्बसदृश वस्तू पोलिसांनी निकामी केल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान, ज्ञानेश्वर कारमोरे यांचा मुलगा अमरावती येथील नवोदय विद्यालयात प्राध्यापक आहे, त्याचा साखरपुडा एका मुलीसोबत झाला आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणाला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्या मुलीशी कारमोरे यांच्या मुलाचा साखरपुडा झाला तिच्या प्रियकरानेच ही बॉम्बसदृश्य वस्तू घरासमोर लावल्याची माहिती पुढे येत आहे. आपल्या प्रेयसीसाठी युवकाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरापुढे ही बॉम्बसदृश्य गोष्ट लावल्याचा पोलिसांना संक्षय आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशात पाटणकर यांनी ज्या मुलीशी कारमोरे यांच्या मुलाचा साखरपुडा झाला आहे तिच्याशी संपर्क साधला आहे. या मुलीबरोबरच तिच्या घरच्या मंडळींचीही चौकशी केली जाणार आहे. सदर वस्तू या मुलीच्या कथित प्रियकराने कधी, कुठे, कशी बनवली. त्याला यासंदर्भातील काही प्रशिक्षण आहे का? या वस्तूचा खरंच स्फोट होण्याची क्षमता होती का यासारख्या प्रश्नांची उत्तर या युवकाकडून मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल.
नवरा प्रेयसीसोबत तर पत्नी प्रियकरासोबत गेली पळून; तीन चिमुकल्या रडत आहेत…
महिला पोलिसाच्या मुलाने प्रेमप्रकरणातून घेतला जगाचा निरोप…
एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…
विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध अन् शिक्षिकेची दुसऱ्यासोबत…
प्रेमी युगलाने एकमेकांना घट्ट बांधून विहिरीत उडी घेतली अन्…

