
एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…
कर्जत : एकतर्फी प्रेमातून श्रावणी मोहन पाटोळे या बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना राक्षसवाडी बुद्रुक येथे घडली आहे. श्रावणी हिचे पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्या दृष्टीने ती तयारी देखील करत होती. मात्र, तिचे हे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राक्षसवाडी येथील प्रतीक लक्ष्मण काळे या युवकाने श्रावणीवर एकतर्फी प्रेमामधून हा हल्ला केला. श्रावणी ही पुण्यातील हडपसर येथील भेकराईनगर येथे राहत होती. श्रावणीच्या आईचे माहेर राक्षसवाडी असून, ती आजी, आजोबा व मामाकडे येत असे. प्रतीकचे श्रावणीवर एकतर्फी प्रेम होते, प्रतीक हा त्यांचा नातेवाईकच आहे. श्रावणीला भेटण्यासाठी वारंवार पुणे येथे जात होता. सुरुवातीला श्रावणीच्या आई-वडिलांना याबाबत कोणतीही शंका आली नाही. मात्र, प्रतिकच्या बोलण्यावरून त्यांना शंका येऊ लागली आणि त्यांनी त्याला पुणे येथे येण्यास विरोध केला. त्याला यापुढे आमच्या घरी येऊ नको आणि श्रावणीलाही त्याच्याशी बोलू नको, असे त्यांनी सांगितले होते.
पुणे येथे येण्यास बंदी घातल्यामुळे प्रतीकच्या मनात राग होता. मामाच्या घरी आलेल्या श्रावणीला जेव्हा तो भेटायला गेला, तेव्हा सोबत त्याने धारदार सुरा नेला होता. घरात कोणी नसताना त्याने एकतर्फी प्रेमातून श्रावणीची हत्या केली. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
प्रेम! पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्यानं लावला प्रेयसीच्या खुनाचा छडा…
अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…
पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!
पोलिसकाकाने मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर केली आत्महत्या…
आयपीएस वडिलांचा आदर्श! वकिली सोडून ईशा सिंह बनल्या आयपीएस…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

