
ट्रक आणि कारचा भीषण अपघात 6 ठार; पाहा नावे…
नागपूर : नागपूरमध्ये ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच गावातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक आणि कारचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे
लग्न समारंभ आटोपून आपल्या गावी परतत असताना हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व जण मेंढेपठार बाजार या गावातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये दोन सख्ख्या चुलत भावांचा समावेश आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मृतांची नावे पुढीलप्रमाणेः
अजय दशरथ चिखले वय 45,
विठ्ठल दिगांबर धोटे वय 45,
सुधाकर रामचंद्र मानकर वय 42,
रमेश हेलोंडे वय 48,
मयूर इंगळे
वैभव साहेबराव चिखले (सर्व राहणार मेंढेपठार बाजार)
या अपघातामध्ये जगदीश ढोणे वय 40 हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…
नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 4 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू…
भीषण अपघात! दोन सख्ख्या भावांसह पाच मित्रांचा जागीच मृत्यू…
भिक्षुकाचा अपघाती मृत्यू, गोधडीत सापडले लाखो रुपये…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

