हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…

रामगढ (छत्तीसगड) : विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरा-नवरी मोटारीमधून घरी निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांच्या मोटारीला झालेल्या अपघातात नवरा-नवरीसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (रविवार)) सकाळी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

छत्तीसगढच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या कारला ट्रकने जोराची धडक दिली. कार रामगढहून अकलताराच्या दिशेने जात होती. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले. कारमधील सर्वांना रामगढच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. लग्न सोहळा आटोपून सर्वजण बलौदाला परत येत होते. दरम्यान, धडक देणाऱ्या ट्रकचा चालक फरार झाला आहे. लग्नसोहळ्यामुळे आनंदी असलेलं वातावरण अपघातानंतर आक्रोशात बदलले. नवरा-नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बलौदातील शुभम सोनी आणि शिवनारायण येथे राहणाऱ्या नेहाचा शनिवारी (ता. ९) विवाह झाला. त्यानंतर शुभम आपल्या नववधु नेहासह गाडीने घरी परतत होता. त्यांच्यासोबत कुटुंबातील आणखी तिघेजण होते. पहाटे पाचच्या सुमारास पकरिया जंगल इथं चंडी देवी मंदिराजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. धडकेनंतर मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या जखमी लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी आले. त्यांनी अडकलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयात नेले , पण उपचाराआधीच सर्वांचा मृत्यू झाला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आणण्याची वेळ आली बापावर…

हृदयद्रावक! दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आल्या अन्…

हृदयद्रावक! पतीचा मृत्यूनंतर मुलाला विष पाजून घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!