स्वारगेट पोलिसांनी अट्टल सराईत गुन्हेगारास शिताफीने केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहर व पुणे जिल्हयांमध्ये घरफोडया, दरोडा, जबरी चोरी करणारा आणि गेल्या तीन वर्षांपासून फरार असणाऱ्या अट्टल सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. १४४ / २०२३ भा.द.वि कलम ४५७, ३८० मधील फिर्यादी यांचे घराचे दरवाजाची कडी उघडून घरातील लोखंडी कपाट उचकटून त्यामधील सोन्याचे दागिने चोरटयाने घरफोडी करुन चोरुन नेले आहेत म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दाखल गुन्हयातील चोरीस गेले मालाचा व अज्ञात चोरटयाचा हददीमध्ये शोध घेत असताना तपास पथकातील पोलिस अंमलदार सुजय पवार व सोमनाथ कांबळे यांनी दाखल गुन्हयाचे आजुबाजुचे सीसीटिव्ही फुटेज तपासले असता आरोपीचा काहीएक सुगावा लागत नव्हता.

सदर आरोपीबाबत सलग ३ ते ४ महिने तपास केल्यानंतर सीसीटिव्ही फुटेज व गुप्त बातमीदारामार्फत तपासअंती सदर गुन्हा करणारा आरोपी हा पापासिंग दयालसिंग दुधानी असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन तो कायमस्वरुपी स्वतः जवळ धारदार हत्यार बाळगुन घरफोडी व जबरी चोरी करणारा असुन तो गेले ०३ वर्षांपासून अनेक गुन्हयांमध्ये फरार आरोपी असून तो कोणाच्याच हाती लागत नव्हता.

सदर आरोपी हा कान्हेफाटा आंबेवाडी (ता. वडगाव मावळ जि पुणे) येथे राहत असलेल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी तपास पथकातील पोलिस अंमलदार सुजय पवार व सोमनाथ कांबळे यांना मिळाल्याने सदर बातमीबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना दिली असता वरिष्ठांनी सदर बातमीबाबत पोलिस उपआयुक्त परिमंडळ ०२ पुणे शहर व सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर यांना माहिती दिली. वरिष्ठांनी मार्गदर्शन व योग्य सुचना देवुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर यांनी सदर आरोपी यास पकडणेकामी एक पथक तयार करुन सदर तपास पथकास योग्य सुचना व मार्गदर्शन करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले.

तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पो/अं सुजय पवार, सोमनाथ कांबळे, शिवदत्त गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, अनिस शेख, दिपक खंदाड, मपोअं स्मिता सिताप व शितल गायकवाड असे पथक तयार करुन सदर पथकासह कान्हेफाटा आंबेवाडी येथे आरोपी पापासिंग दुधानी याचे राहते घरावर रात्रभर पाळत ठेवून पहाटेच्या सुमारास त्याचे घरास घेराव घालुन अचानकपणे धाड मारली असता आरोपी पापासिंग दुधानी जिन्यावरुन उडी टाकुन पळुन जाण्याचे प्रयत्नात असताना स्टाफचे मदतीने त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचेजवळ असणारे घातक हत्यार जागीच ताब्यात घेवुन त्यास पकडण्यात आले. तद्नंतर सदर आरोपीस दाखल गुन्हयात अटक करुन पोलिस कोठडी दरम्यान त्याचेकडे तपास पथकातील पो/अं शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, फिरोज शेख व रमेश चव्हाण यांनी कसुन तपास केला असता त्याने दाखल गुन्हयातील चोरी केलेले व स्वारगेट परिसरामध्ये चोरी केलेले सोन्याचे दागिने लोणावळा येथील सोनार दुकानदार यास विक्री केले असल्याचे सांगितले. आरोपीचे निवेदन पंचनाम्यावरुन सदर ठिकाणी जावुन मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीकडुन तपासादरम्यान स्वारगेट पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयातील एकुण १५४ ग्रॅम (१५ तोळे ४ ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने घर फोडीसाठी लागणारी हत्यारे, सोन्याचे वजन मोजन्याची इलेक्ट्रीक मशीन, गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण ०८,६५,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन स्वारगेट पोलिस स्टेशनकडील एकुण ०४ गुन्हे उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी ही प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, नारायण शिरगांवकर, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस यांच्या स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पो / अ १००५७ सुजय पवार, पो/अं ८२३९ सोमनाथ कांबळे, पो/अं १००१६ शिवदत्त गायकवाड, पो/ अं १००६२ फिरोज शेख, पो/अं ९८२० अनिस शेख, पो/ अं १००६८ रमेश चव्हाण, पो/अं १०१४७ संदीप घुले, पो / अं ९९६३ दिपक खंदाड, म.पो / ना ७२११ शितल गायकवाड, ७२५७ स्मिता सिताप यांनी एकत्र मिळुन केली आहे.

स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले जेरबंद…

पुणे शहरात दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीस युनिट ५ने केले जेरबंद…

पुणे शहरातून तडीपार केलेल्या गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी घेतले ताब्यात…

पुणे शहरात युवकाचा लाथा बुक्क्यांनी मारहाण करून खून…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीकडून चार मोटारसायकली केल्या जप्त…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!