
पुणे शहरात युवकाचा लाथा बुक्क्यांनी मारहाण करून खून…
पुणे : पुणे शहरात मोटारीचा धक्का लागल्याच्या कारणाने झालेल्या वादातून युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १२) रात्री घडली आहे. अभिषेक संजय भोसले (वय ३०, रा. शेवाळवाडी, मांजरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही हत्या झाली. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास फुरसुंगी ते चंदवाडी रोड रस्त्यावर ही घटना घडली. केवळ कारचा धक्का लागला यावरून अभिषेक याचा काही युवकांसोबत वाद झाला. मात्र बघता बघता तो वाद खूप पेटला. याच वादातून आरोपींनी अभिषेक याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याचा खून केला. याप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट (सर्व रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांच्यासह आणखी ७ ते ८ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’
फुरसुंगी ते चंदवाडी रोड रस्त्यावर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मोक्का ९६! निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! पुणे शहरात चहा पित असताना डोक्यावर पडली झाडाची फांदी…
पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…
पुणे शहरात युवकाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

