Video: युवतीसोबत डान्स करणं होमगार्डला पडलं महागात…

मुंबईः लोकल ट्रेनमध्ये एका युवतीसोबत होमगार्डला डान्स करणे महागात पडले आहे. युवतीसोबत डान्स करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित गार्डवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. युवतीच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली पण होमगार्डला नोकरी गमवावी लागली आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सोशल मीडियावर एक होमगार्ड कर्मचारी युवतीसोबत लोकल ट्रेनमध्ये नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 6 डिसेंबरला ही घटना घडली होती. मध्य रेल्वेच्या सेकंड क्लास डब्यात रात्रीच्या वेळी तरुणी डान्स करत रील शूट करत होती. जीआरपीने या व्हिडीओची दखल घेतली असून, या होमगार्डविरोधात योग्य कारवाई केली असल्याची माहिती दिली आहे.

सायबा या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत ती वर्दीत असणाऱ्या होमगार्डसह नाचताना दिसत आहे. एस एफ गुप्ता अशी या होमगार्डची ओळख पटली आहे. व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, सायबा ट्रेनमध्ये नाचत असते. यावेळी तिचा धक्का गुप्ता यांना लागतो. ते तिला दरवाजापासून लांब उभं राहण्यास सांगतात. पण काही वेळाने तेच तिच्यासह नाचताना दिसतात. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या अधिकृत हँडलमध्ये होमगार्डवर त्वरित कारवाई करण्यासाठी आरपीएफला टॅग करण्यात आले होते. यानंतर एस एफ गुप्ता या होमगार्डवर कारवाई करण्यात आली आहे. जीआरपीने एक्सवर माहिती देत सांगितलं की, “6 डिसेंबरला लोकल ट्रेन पेट्रोलिंगदरम्यान एक होमगार्ड गणवेशात नृत्य करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन व सत्यता पडताळून, संबंधित होमगार्डवर योग्य ती कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी दक्षता घेत आहोत”.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (GRP) एक्सवर प्रतिक्रिया दिली. जीआरपीने कर्मचाऱ्यांना गणवेशात आणि कर्तव्यावर असताना अशा गोष्टींमध्ये न पडण्याचा सल्ला दिला आहे. पण, एका युवतीसोबत नृत्य केल्यामुळे होमगार्डला नोकरी गमवावी लागली आहे, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

धक्कादायक Video: पोलिस अधिकाऱ्यामुळे महिलेला गमवावा लागला जीव….

Video: लोकसभेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे आहे कोण?

Video: पोलिसकाकाने आजीला उचलून घेत घडवलं देवाचं दर्शन…

Video: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण…

Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!