
भारतीय वैमानिक जखमी होऊनही भिडला, 174 प्रवाशांचा वाचवला जीव…
दुबईः दुबईहून तेल अवीवला जाणारे प्रवासी विमान हायजॅक झाल्याचा संदेश नियंत्रण कक्षाला गेल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे (Fly dubai) प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांचे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी कौतुक केले आहे.
भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल मी त्यांना सलाम करतो. शरीरात धारदार शस्त्र खुपसलं गेल्यामुळे गंभीररित्या जखमी होऊनही ते लढले, त्यांनी विरोध केला आणि विमानाच्या कॉकपीटचा दरवाजा उघडला. त्यामुळे प्रवाशी आणि विमानच्या क्रू ला मिळून हल्लेखोराला काबूत आणता आले. यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. कॅप्टन स्मित मच्छार यांनी इस्रायलच्या नागरिकांसह 174 प्रवाशांचा जीव वाचवला. कॅप्टन स्मित मच्छार यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होवो. ते खरे नायक आहेत, अशा शब्दांत बिन्यामिन नेत्यानाहू यांनी त्यांचे कौतुक केले.
View this post on Instagram
काल दुबईहून तेल अवीवला जाणारे प्रवासी विमान हायजॅक झाल्याचा संदेश नियंत्रण कक्षाला गेल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. त्यावेळी विमानाच्या संरक्षणासाठी इस्रायली लढाऊ विमाने (फायटर जेट्स) देखील घटनास्थळी पोहोचली आणि विमानाला एस्कॉर्ट करून सौदी अरेबियाच्या विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. त्यानंतर या साऱ्या प्रकाराचा उलगडा झाला होता. या विमानाचा ओमानचा को पायलट फ्लाय दुबईच्या विमानावर नियंत्रण मिळवून ते क्रॅश करण्याच्या तयारीत होता. मात्र, भारतीय वंशाचा पायलट स्मित मच्छार याने ओमानच्या को पायलट याचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी ओमानच्या वैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने हल्लाही केला. हा चाकू लागून स्मित मच्छर यांना दुखापतही झाली. मात्र, तरीही त्यांनी प्रतिकार करुन ओमानच्या वैमानिकाचा आत्मघाताचा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय वंशाच्या स्मित मच्छर हे 2022 मध्ये फ्लाय दुबईत वैमानिक म्हणून रुजू झाले होते. तत्पूर्वी 10 वर्षे ते स्पाइस जेटमध्ये पायलट म्हणून काम करत होते. मूळ मुंबईचे असलेले स्मित मच्छर त्यांच्या कुटुंबासह दुबईत वास्तव्यास आहे.
दरम्यान, फ्लाय दुबईचे विमान हवेत असताना नियंत्रण कक्षाला अचानक ‘७७००’ हा स्क्वॉक कोड पाठवण्यात आला. काही वेळानंतर विमानाने ‘७५००’ हा कोड प्रसारित केला, ज्याचा वापर सामान्यतः विमान हायजॅक झाल्यास किंवा कोणत्याही बेकायदेशीर हस्तक्षेपाच्या वेळी केला जातो. यानंतर विमानाने आपला मार्ग बदलून सौदी अरेबियाच्या दिशेने वळण घेतले. या विमानात इस्रायलयचे 150 प्रवाशी असल्यामुळे हे विमान हायजॅक झाल्याच्या शक्यतेने एकच खळबळ उडाली होती.
दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…
तानाजी सावंत यांच्या मुलाचे चार्टर्ड फ्लाईट विमान हवेतूनच माघारी; 68 लाख रुपये खर्च…
पायलट युवतीच्या आत्महत्येबद्दल पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर…
राज्य सरकारकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश…
भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…

