
युवकाने आत्महत्येसाठी केलेले दृश्य पाहून पोलिसही हादरले…
मुंबई : मिरा रोड येथील कनकीया परिसरात राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरात गॅसचा पाइप तोंडात धरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण दीपक कपाडिया असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, करणने स्वयंपाकाच्या गॅसचा पाइप तोंडात धरून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मिरा रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. करण कोणत्या मानसिक तणावाखाली होता का याचा तपास पोलिस करत आहेत.

कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून कोणतीही सुसाईड नोट सापडली आहे का याचीही तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शांत स्वभावाचा तरुण म्हणून करणची ओळख होती, असे शेजाऱ्यांनी सांगितले.
पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…
लोणावळा! अखेर श्रेयाच्या मृत्यूचं गुढ उकललं, तपासात धक्कादायक वळण…
अजितदादांच्या अंत्यसंस्कारावेळी लाखो रुपयांची चोरी; 7 चोरट्यांना अटक…
राज्य सरकारकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश…

