
महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ; नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; पाहा नावे…
वाशिम : वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं एका प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला असून, 2011 साली कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणातील 9 पोलिसांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वाशिम जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला आहे. या निकालामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
वाशिमच्या रिसोड पोलिस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेला आरोपी बेग्या पवार याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देत यासाठी 9 पोलिस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या वाढोणा गावातील पारधी समाजाचा बेग्या पवार या आरोपीला 9 मे 2011 रोजी त्याला पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर त्याचा 10 मे 2011 रोजी पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. तब्ब्ल 15 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
View this post on Instagram
रिसोड पोलिस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे, यांच्यासह पोलिस कर्मचारी मदन पवार, शिवाजी खिल्लारी, पंजाब पाटकर, रमेश पवार, प्रकाश हिरालाल तारम नागोराव खांडके, अशोक वैद्य, आणि वसंत जाधव या 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सीआयडीने 34 दिवस तपास करून खुनाच्या गुन्ह्यासह स्पेशल ऍट्रॉसिटीचाही गुन्हा पोलिसांवर दाखल केला होता.
सरकारी वकील श्रीराम नारायणराव काळू यांनी बाजू मांडली. बेग्या पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नव्हता, त्यामुळे कोणताही गुन्हा सिद्ध नसताना कायदा हातामध्ये घेऊन कोठडीत त्याचा अमानुष छळ करण्याचा अधिकार पोलिसांना नाही, हा कायदेशीर मुद्दा त्यांनी न्यायालयात मांडला. न्यायालयाने सर्व आरोपींना भारतीय दंड संहितेच्या खून, कबुलनामा मिळवण्यासाठी अमानुष छळ करणे व गंभीर दुखापत करणे, समान उद्देशाने गुन्हा करणे आणि गुन्हेगारी कारस्थान रचणे यासारख्या विविध गंभीर कलमांन्वये दोषी घोषित केले. या सर्व कलमांच्या आधारे न्यायालयाकडून हा अंतिम न्यायनिवाडा करण्यात आला.
कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, त्याच यंत्रणेतील तत्कालीन ठाणेदारासह 9 कर्मचार्यांना एका नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी थेट खुनाच्या आणि छळाच्या कलमांखाली जन्मठेपेसारखी ऐतिहासिक व कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. या ऐतिहासिक निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Video : पुणे पोलिस दलातील PSI संदीप कदम यांचे निलंबन…
देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना; तब्बल 9 पोलिसांना फाशीची शिक्षा…
पोलिसकाकाचा खून केल्या प्रकरणी हिवरी येथील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा…
Video: पोलिस अधिकाऱ्याचे वर्दीतच अश्लील चाळे, DGP वर निलंबनाची कारवाई…
पोलिस अधिकारी API अश्विनी बिद्रे प्रकरणी न्यायालयाने सुनावली दोषींना शिक्षा…

