मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा नव्हता: खुशबू सुंदर

उडपी (कर्नाटक): उडपीतील पॅरामेडिकल कॉलेजच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा बसवून मुलींचे प्रायव्हेट व्हिडीओ चित्रित केल्याची बातमी खोटी आहे, त्यात काहीही तथ्य नसून त्या अफवा आहेत, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी स्पष्ट केले आहे.

उडपीच्या पॅरामेडिकल गर्ल्स कॉलेजच्या तीन विद्यार्थीनी आणि प्रशानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागताच खुशबू सुंदर यांनी या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. घटनास्थळी भेट देऊन माहिती घेणाऱ्या खुशबू सुंदर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा असल्याची बातमी सत्य नसून त्या अफवा आहेत. त्यासंबंधित खोटे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ही एक शैक्षणिक संस्था असून या ठिकाणी कोणतेही छुपे कॅमेरे नाहीत. या संबंधित पोलिसांशी चर्चा सुरू असून, महिला आयोगही यावर तपास करत आहे. या संबंधित सत्य हे लवकरच समोर येईल.’

संबंधित घटनेला राजकीय रंग मिळत असल्याचे दिसून येत आहे. गुन्हा नोंद झालेल्या तीन मुली या मुस्लिम असून त्यांनी हिंदू मुलीविरुद्धचा हा कट रचल्याचा आरोप हिंदूत्ववादी नेत्यांनी केला होता. यावरून राजकारणही तापवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानंतर आता त्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी ही बातमी अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कर्नाटकातील ‘नेत्र ज्योती इन्स्टिट्यूट ऑफ अलाइड हेल्थ सायन्सेस’ या कॉलेजच्या शौचालयातील व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या संदर्भात पोलिसांनी स्वत:हून दखल घेऊन दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. तीन मुली आणि महाविद्यालयाच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!