खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…

पुणे: केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी कट रचून केतनचा जीव घेतला. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून दररोज स्वतःच्या बचावासाठी नवनवे दावे केले जात आहे. पोलिस चौकशीत या प्रकरणाचे नवे हादरवणारे खुलासेही समोर येत आहेत.

एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा संपूर्ण कट असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिस तपासात सिया हिच दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं असून ती 12 वी नापास असल्याचे समजले आहे. सोबतच तिला दारूसह इतर वाईट सवयींमुळे तिचे आई-वडील प्रचंड त्रस्त होते. सियाचे यापूर्वीही अनेक बॉयफ्रेंड राहिले होते. आपली मुलगी हाताबाहेर गेली आहे, हे समजल्यामुळे तिचे लग्न लावून तिचे आयुष्य स्थिर करण्याचा तिच्या पालकांचा प्रयत्न होता. त्यासाठी पालकांनी तिच्यासाठी केतनची निवड केली होती. केतन हा चांगल्या घरातील आणि सुशिक्षित मुलगा होता. शिवाय घरची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती. त्यामुळे सियाने केतनसोबत लग्न करावं, यासाठी तिच्या पालकांचा दबाव होता. केतनला रिजेक्ट करता यावं, अशी एकही गोष्ट सियाकडे नव्हती. त्यामुळेच सियाने केतनला मारण्याचा कट रचला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी अनेक खळबळजनक आरोप केले असताना पोलिस कोठडीत असलेली मुख्य आरोपी सिया गोयल हिचं वर्तन खूपच हट्टी स्वरूपाचं दिसत आहे. यावेळी ती चौकशीला सहकार्य करत नसून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ती थेट मौन बाळगत असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पोलिस जेव्हा तिला प्रश्न विचारतात, तेव्हा ती काही प्रश्नांची उत्तरं देत नाहीये, मात्र तिने या भयानक कटाचा मुख्य सूत्रधार स्वतःच असल्याचं कबूल केले आहे. चौकशीत सियाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, केतनला संपवण्यासाठी तिने आणि चेतनने एक सांकेतिक भाषा ठरवली होती. तिने चेतनला सांगितलं होतं की, “जेव्हा आपण किल्ल्यावर असू तेव्हा मी खाली वाकेन, तेव्हा तू समजून जायचं की केतनला धक्का देण्याची हीच ती वेळ आहे.”

सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…

सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…

केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…

केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…

केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…

पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…

केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…

पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…

पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!