
पुणे! पोलिसांच्या वाहनाच्या बोनेटवर बसवून फिरवल्याप्रकरणी कारवाई…
पुणे : पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात जुलै महिन्यात झालेल्या खून प्रकरणातील संशयित आरोपींना पोलिसांच्या वाहनाच्या बोनेटवर बसवून परिसरात फिरविणे तसेच त्यांना मारहाण केल्याचा कथित प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद आता प्रशासकीय पातळीवर उमटू लागले आहेत.
या प्रकरणाची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, झोन-दोनचे पोलिस उपायुक्त तसेच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना नोटीस बजावली असून, २० ऑगस्टपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
View this post on Instagram
या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयाने अंतर्गत बदल्यांच्या आदेशात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसींग संभाजी पाटील यांची विशेष शाखेत बदली केली आहे. त्यांच्या जागी गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक सुरेश (सुदाम) गायकवाड यांची भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपींना सार्वजनिकरीत्या वागविण्याच्या कथित प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राज्य मानवाधिकार आयोगाच्या अहवालानंतर या प्रकरणात आणखी कोणती प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे पोलिसांनी स्कॉर्पिओवरून बसवून काढली आरोपींची धिंड…
पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची काढली धिंड…
पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…
पुणे शहरात गुंडाची रॅली काढणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई; काढली धिंड…
Video: हडपसर पोलिसांनी गुन्हेगारांची काढली धिंड; पाहा नावे…

