
पुणे शहरातील पबमध्ये पार्टी रंगली असतानाच पोलिसांची अचानक धाड अन्…
पुणे: पुणे शहरातील विमानतळाच्या जवळ असलेल्या एका नामांकित पबमध्ये पहाटे तीनच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक धाड टाकल्यानंतर एकच धावपळ उडाली. ठराविक वेळेची कालमर्यादा संपल्यानंतरही पहाटेपर्यंत दारू आणि म्युझिकचा धिंगाणा सुरू असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पुणे शहरातील रात्रीच्या पार्ट्या आणि वेळेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. पुणे विमानतळाजवळ असलेल्या ‘हौज कम्युन’ नावाच्या पबमध्ये नियमांचे उल्लंघन करून उशिरापर्यंत पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. प्रशासकीय नियमांनुसार पब आणि बार रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, या नियमांना केराची टोपली दाखवत हा पब पहाटे ३ वाजेपर्यंत बिनदिक्कतपणे सुरू होता.
View this post on Instagram
माहितीची खात्री पटताच गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास पबवर छापा टाकला. पोलीस अचानक आत शिरल्याने तेथे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. या कारवाईदरम्यान पबमध्ये पार्टी करत असलेल्या ६२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पब मालक आणि व्यवस्थापनावर वेळेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि अवैधपणे पब सुरू ठेवल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुणे पोलिसांनी अचानक घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे पुण्यातील ‘नाईट लाईफ’ आणि पब चालकांचे धाबे दणाणले आहेत.
Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे शहरातील पबकडून कंडोम अन् ओआरएसचे पाकीटाचे वाटप अन् पुढे…
पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

