पुणे! हिंजवडीमधील IT इंजिनिअरने संपवलं जीवन; चिठ्ठीत दोन महिलांचे नावे…

पुणे : हिंजवडी येथील एका नामांकित आयटी कंपनीमधील वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ आणि मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका आयटी (IT) अभियंत्याने आत्महत्या केली आहे. अमित ब्रम्हे (वय ४८) असे या अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी आयटी कंपनीतील दोन वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

आयटी अभियंता अमित ब्राम्हे यांनी 2 जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी अमित यांनी लिहिलेल्या दोन पानांच्या सुसाईड नोटने कंपनीतील अंतर्गत छळाची भीषणता समोर आणली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांची नावे स्पष्टपणे लिहिली आहेत. अमित ब्राम्हे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कंपनीतील वरिष्ठ सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक छळाचा पाढाच त्यांनी या नोटमध्ये वाचला आहे. चांगले प्रोजेक्ट्स काढून घेणे, जाणूनबुजून अत्यंत कठीण कामे देणे, इतर स्टाफसमोर वारंवार अपमान करणे आणि नोकरी सोडण्यासाठी सातत्याने दबाव टाकणे, असा छळ या दोन्ही महिला सहकाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप अमित यांनी केला आहे. शिवाय, मित्र विनोदचा देखील उल्लेख असून त्याने त्रास दिल्याचं म्हटले आहे. विनोद याने अमित यांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या आणि कंपनीत त्यांची बदनामी केली, असा उल्लेख या नोटमध्ये आढळला आहे. या सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळूनच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अमित यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.

दरम्यान, अमित ब्राम्हे यांच्या सुसाईड नोटच्या आधारे भोसरी पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप पोलिसांकडून कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास सुरू आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे आयटी क्षेत्रातील वाढता मानसिक तणाव, अंतर्गत राजकारण आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पुणे! हिंजवडीत IT इंजिनिअर युवतीने चिठ्ठी लिहून 21व्या मजल्यावरुन मारली उडी…

हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…

हिंजवडी येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या…

पुण्यातील नामांकित IT कंपनीत नेमकं काय घडलं? रात्रीत गेले 700 जणांचे जॉब…

सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीचा मृतदेह पाहून पत्नीने मारली सतराव्या मजल्यावरुन उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!