
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी; भावाच्या मृत्यूचा धक्का…
पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधे विषारु दारु प्यायल्याने आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अनेकजण गंभीर आहेत. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्यातील काळे पडळ भागात तीन आणि हडपसर भागात दोन अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
विषारी स्पिरिटयुक्त दारु योगेश वानखेडे याने बनवली होती. ती दारु पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मिळून विकली गेली. दापोडी, फुगेवाडी, हडपसर, काळेपडळ भागातील ज्यांनी दारु प्यायली ते तोंडाला फेस येऊन मृत्युमुखी पडले. योगेश वानखेडे हा सराईत दारु विक्रेता असून या आधी अनेक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
View this post on Instagram
पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी ८ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने संपूर्ण परिसरात घबराट आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. मृतांमध्ये पांडुरंग सदाशिव फुगे (वय ५७), विजय प्रकाश राठोड (वय ३१), राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४), राजेंद्र राजपूत (वय ५१), अकबर पठाण (वय ५२), आनंद देसाई (वय ५३) आनंदा निकाळजे (वय ३५) यांचा समावेश आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, याच परिसरातील रहिवासी असलेल्या आणखी दोघांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू असून, दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बंदी असलेली हातभट्टीची गावठी (विषारी) दारू प्यायल्यानेच या नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरणही तापले असून, अशा अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, ८ पैकी ५ नागरिकांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे मृत पावलेल्या ८ पैकी ५ व्यक्तींना मृत्यूपूर्वी तीव्र चक्कर आली होती, अशी माहिती पोलिसांनीच दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. उर्वरित मृत नागरिक आणि सध्या उपचार सुरू असलेल्या व्यक्तींची प्रकृती नेमकी दारू प्यायल्याने बिघडली होती का? याचा तपास सध्या सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. एकाच दिवसात मृत पावलेले सर्व नागरिक एकाच परिसरातील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला, की पोलिस म्हणत असल्याप्रमाणे अन्य कोणत्या आजाराने किंवा कारणाने झाला ? हे अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवालाअंती स्पष्ट झालेले नाही. या संभ्रमामुळे फुगेवाडी परिसरातील नागरिकांची चिंता कमालीची वाढली आहे.
मृत विजय राठोड हे बुधवारी विश्रांतवाडी येथे गेले असता तिथे त्यांना चक्कर आली आणि गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. विजय यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्यांचे भाऊ राजेंद्र राठोड यांना तीव्र मानसिक धक्का बसला आणि त्यांना फिट आली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच पांडुरंग फुगे यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून त्यांना दारूचे कोणतेही व्यसन नव्हते. दुसऱ्या घटनेत राजेंद्र राजपूत यांना गुरुवारी अचानक चक्कर आली आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या संपूर्ण रहस्यमय मृत्यूप्रकरणी पोलिस आता अधिकृत वैद्यकीय अहवालाची वाट पाहत असून, नेमका मृत्यू कशामुळे झाला याचे संपूर्ण सत्य लवकरच समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
लातूर! धाब्यावर चिकन अन् दारू पाजली अन् जाळून मारलं पण कानून के हात लंबे होते है…
धक्कादायक! विषारी दारु प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू…
पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये तिघांना लाखो रुपयांचा गंडा…
रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिने आयुष्य का संपवलं? कारण आलं समोर…
धक्कादायक! मृत नवरी निघाली जिवंत अन् थेट पोहचली पोलिस स्टेशनला…

