खडक पोलिस स्टेशन हद्दीत अतिक्रमणांवर कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): खडक पोलिस स्टेशन हद्दीत लोहिया नगर व परिसरात अवैद बांधकामे व चौका चौकामधील अतिक्रमणांवर पोलिस व महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.
खडक पोलिस स्टेशन हद्दीत लोहिया नगर व परिसरात अवैद बांधकामे व चौका चौकामध्ये ठेवण्यात आलेले बाकडे व अनधिकृतपणे बांधलेले कट्टे व ओटे यावर अनेक समाजकंटक सायंकाळच्या वेळी थांबून येणा-या जाणा-या इसमांना व काही वेळा तर महिलांना त्रास होईल अशा पद्धतीने उभे राहत होते. तसेच या समाजकंटकांमध्ये काही जातीय किंवा धार्मिक अभिनिवेश उफाळून आल्यास त्यातून मोठी भांडण किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या सर्व प्रकारावर प्रभावी प्रतिबंध आणण्यासाठी सदर समाजकंटकांकडून तेथे उभे राहणे व त्यांचे बसण्याचे ठिकाण हटवणे गरजेचे होते. त्यामुळे खडक पोलिस स्टेशन येथे नव्याने हजर झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे व पोलिस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमाळस यांनी या अनुषंगाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी त्यासाठी महानगरपालिकेचे अधिका-यांशी संपर्क केला. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने १०/०७/२०२४ रोजी दुपारी १२/३० वा ते १६/०० वा. दरम्यान लोहीयानगर परिसरात गल्ली नं १ ते ४ व लोहीयानगर पोलिस चौकी ते लोहीयानगर कमान याभागात अतिक्रमण विरोधी कारवाई मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
सदर मोहिमे दरम्यान पुढील प्रमाणे वस्तू हटविण्यात आल्या १) टप हातगाडी- ०४, २) बिगर टप हातगाडी- ०३, ३) काउंटर – ०२, ४) शेड / झोपड्या – ०६, ५) ईतर -०७, ६) नादुरुस्त रिक्षा – ०१ तसेच काँक्रीट ओटे घण, पहारच्या साहाय्याने फोडण्यात आले. लोखंडी पत्रा शेड, स्टॉल गॅस कटरच्या साहाय्याने कापण्यात आले. सदर वेळी पूर्णकाळ पोलिस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमाळस तसेच पोलिस अधिकारी १ ) सपोनि विक्रम मिसाळ, २) सपोनि वैशाली तोटेवार, ३)पो.उप-निरी. प्रल्हाद डोंगळे व खडक पोलिस स्टेशन कडील १५ अंमलदार हजर होते. तसेच महानगरपालिकेकडून क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक श्री गणेश तारू, अतिक्रमण निरीक्षक श्री राजेंद्र
लोंढे, सहायक अतिक्रमण निरीक्षक श्री राठोड, व श्री खैरनार व बिगारी सेवक २०, महाराष्ट्र सुरक्षा फोर्स ०६ व ४ टेंम्पो ट्रक हजर होते.
सदरची मोहीम यापुढेही अशीच चालू ठेवण्यात येणार असून अनधिकृत रीत्या अतिक्रमण केलेल्यांनी त्यांची अतिक्रमणे वेळीच काढून न घेतल्यास त्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने अतिक्रमणे काढून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आव्हान महानगरपालिकेकडून व पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…
IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…
पुणे शहरात गाडी अडवली म्हणून दोघांची पोलिसाला जबर मारहाण…
हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…
पुणे शहरात महिला पोलिसाला जिंवत जाळण्याचा प्रयत्न; आरोपीला कोठडी अन्….
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…