हृदयद्रावक! घरात मुलीच्या बारशासाठी लगबग अन् मातेने कवटाळले मृत्यूला…

कोल्हापूर: एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरीतील महिलेने काल दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (वय २१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना अस्मिताने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अस्मिताच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अस्मिताचे वर्षभरापूर्वी लग्न झाले. सासरची आर्थिक स्थिती सधन आहे. अवधी एक महिन्याची मुलगी असताना अस्मिता यांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला? याचा उलगडा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अस्मिताच्या गळ्यावर जखमा आढळल्या असून, व्हिसेरा राखीव ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच राहत्या घरी छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 12 जुलै) दुपारी चारच्या सुमारास घडली. लग्नानंतर सात वर्षापर्यंत विवाहितेने आत्महत्या केल्यास मृतदेहाचे शवविच्छेदन, पंचनामा न्यायाधीश आणि इतर पंचांच्या उपस्थितीत केला जातो. सोमवारी सकाळी न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी सासरकडील लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली आहे. लग्न झाल्यापासून पैशासाठी अस्मिता हिचा छळ केला. रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे पाठवले आहेत. आता देखील मुलीच्या बारशासाठी 52,000 हजार रुपयांचा पाळणा ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि सर्व कार्यक्रम करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे काटकर कुटुंबीयांनी माझ्या मुलीची हत्या केली आहे, असा आरोप देखील अस्मिता यांच्या आई वडिलांनी केला आहे. अस्मिताच्या सासरकडील लोकांनी मुलांचे कपडे घेऊन ठेवले होते. परंतु मुलगी झाल्याने त्यांनी सतत अस्मिताचा छळ केला, असा आरोपही अस्मिताच्या आई-वडिलांनी केला आहे.

माझ्या मुलीचं शुक्रवारी शेवटचं बोलणं झालं होते. त्यावेळी बारशा मोठ्याने करा, असे बोलत होती. परंतु मी म्हटलं आताच जास्त पैसे खर्च झाले. रुग्णालयात खर्च झाला, अधिक मासात पैसे खर्च झाले, असा आरोप अस्मिताच्या वडिलांनी केला. सासू, सासरा, नवरा आणि नणंदने अस्मिताचा जीव घेतला, असा आरोप अस्मिताच्या आईने केला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या वेळी अस्मिता यांचे पती, सासू आणि सासरे घराबाहेर गेले होते. कुटुंबातील सर्व सदस्य मुलीच्या बारशासाठी हॉल बघण्यासाठी गेले होते. यावेळी अस्मिता घरी एकट्याच होती. घरात कुणी नसल्याचे पाहून अस्मिता यांनी घराचा मुख्य दरवाजा आतून बंद करून घेतला. त्यानंतर बेडरूममधील छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. काही वेळानंतर पती आणि सासू-सासरे हॉल पाहून घरी परतले. त्यांनी मुख्य दरवाजा ठोठावला असता तो आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बराच वेळ हाका मारून आणि फोन करूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर संशय आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला. आत जाऊन पाहिले असता बेडरूममध्ये अस्मिता यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! पुणे शहरात आईच्या मृत्यूनंतर मुलाने घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! पुण्यात नोकरी मिळाली पण शाम्पूच्या पुड्यांनी घात केला; तिघींचा मृत्यू…

हृदयद्रावक! घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावून छळ; नवविवाहितेची आत्महत्या…

हृदयद्रावक! उच्चशिक्षित महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य…

हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!