अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलेची गोळ्या घालून हत्या; आरोपी…

न्यूयॉर्क : गुगलमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञान एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या एका भारतीय वंशाच्या महिलेची त्यांच्या नवऱ्याने गोळ्या घालून निर्घृण हत्या केल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. शीतल व्रजेसियन असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेत त्यांच्या मुलालाही गोळ्या लागल्या असून, तो गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नवरा किर्क बी. व्रजेसियन (वय ५६) याला मंगळवारी रात्री अटलांटा जवळील कॉब काउंटी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. जॉर्जियामधील स्मर्ना शहरात एका घरात गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री ८ वाजेच्या सुमारास पोलिस घटनास्थळी पोहोचले. घरात प्रवेश केला असता पोलिसांना शीतल व्रजेसियन या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. त्यांच्या अंगावर गोळ्या लागल्याच्या जखमा होत्या, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा जेसन व्रजेसियन (वय २३) हा घराच्या बाहेर जखमी अवस्थेत सापडला. त्यालाही गोळ्या लागल्या होत्या. आपत्कालीन पथकाने त्याला तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले. आरोपी किर्क व्रजेसियन याला सध्या कॉब काउंटी अ‍ॅडल्ट डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. स्थानिक पोलिस पुढील तपास करत आहेत.

शीतल व्रजेसियन या गुगलमध्ये ‘इंजिनिअरिंग लीडर’ म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी हवामान आणि वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातही अनेक वर्षे काम केलं आहे. स्ट्रॅटेजिक लीडरशिप, ई-कॉमर्स आणि वेब टेक्नॉलॉजीमध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या नावावर २ सॉफ्टवेअर पेटंट्स देखील नोंदवलेले आहेत. त्यांचे बालपण इंग्लंड, भारत आणि घाना या तीन देशांमध्ये गेले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेत आल्या. त्यांनी अमेरिकेतील नामांकित ‘जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले होते. त्या पती आणि जेसन व जेसिका या दोन मुलांसह अटलांटामध्ये राहत होत्या.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ला…

पोलिसकाकाचा अमेरिकेत डंका! 40 अंडी, एक किलो चिकन…

गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोल याला NIAने घेतले ताब्यात…

विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!