बिल्डिंगच्या वॉशरूममध्ये घुसून अल्वपयीन मुलीवर अत्याचार…

मुंबई : मुंबईच्या पायधुनी परिसरात बिल्डिंगच्या वॉशरूममध्ये घुसून एका 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पायधुनी पोलिस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली आणि पोलिस ठाण्याला घेराव घातला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

अल्पवयीन मुलगी दुपारी आपल्या बिल्डींगखाली खेळत होती. या दरम्यान खेळता खेळता ती बिल्डींगच्या बाथरूमला गेली होती. अल्पवयीन मुलगी बाथरूमला जात असल्याचे पाहताच वॉचमनने तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय आहे. यानंतर या घटनेची माहिती मिळतात पीडित मुलीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर सध्या उपचार सूरू आहेत. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात स्थानिकांना आणि नातेवाईकांना वॉचमनवरच संशय बळावत त्याला पोलिसांच्या हवाली केले होते. जमावाचा वाढता रोष आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता, पोलिस ठाणे आणि परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, मुंबईच्या पायधुनी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सूरू आहे. आरोपी पायधूनी येथे गोडाऊन मध्ये वॉचमन म्हणून काम करत होता,अ शी माहिती डीसीपी झोन 2 चे अधिकारी विजयकांत सागर यांनी दिली. यासोबत या प्रकरणी नराधम वॉचमनवर पोस्को आणि बलात्कार अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरु आहे.

नसरापूर अत्याचार प्रकरणातील मोठी बातमी! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा…

महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल…

पुणे! अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने कॅफेमध्ये केला लैंगिक अत्याचार अन्…

नात्याला काळीमा! चुलतभाऊ अन् आजोबांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

जळगाव जिल्ह्यात शिक्षकाचा चौथीतील मुलीवर लैंगिक अत्याचार; पोट दुखू लागल्याने…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!