
नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
नाशिक: नाशिक आणि राज्यातील कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला नारेगाव भागातून ताब्यात घेतले आहे. गेल्या २५ दिवसांपासून ती फरार होती.
निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील कैसर कॉलनी येथील एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती. तिचे चार नातेवाईकही त्याच फ्लॅटमध्ये तिच्यासोबत राहत होते. निदा वारंवार आपले लोकेशन बदलत असल्याने पोलिसांना तिला पकडण्यात अडचणी येत होत्या. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी रात्री ११:३० च्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून तिला ताब्यात घेतले आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
दरम्यान, निदा खान २५ मार्चपासून फरार होती. या काळात तिने अटक टाळण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याचाही प्रयत्न केला. तिने नाशिक रोड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र २ मे २०२६ रोजी न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला. जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध अधिक तीव्र केला होता. अटकेनंतर निदा खानची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला ‘ट्रान्झिट वॉरंट’साठी छत्रपती संभाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. आता तिला नाशिकला आणले जाणार असून, आज तिला नाशिक न्यायालयात हजर केले जाईल. निदा खानच्या अटकेमुळे या प्रकरणातील इतर धागेदोरे आणि फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक IT कंपनी अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; घटनाक्रम समोर…
नाशिक! TCS प्रकरणात धक्कादायक खुलासा, पासवर्ड अश्लील शब्दांचा अन्…
नाशिक! TCS कंपनीतील निदा खान हिच्या जामीन अर्जावर सुनावणीपूर्वीच धक्कादायक माहिती समोर…
नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी समोर…
नाशिक! TCS HR निदा खान हिने जामीन अर्जात दिली धक्कादायक माहिती…
नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरण! आयटी कंपनी TCS कडून मोठा निर्णय…
नाशिक! महिला पोलिस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् केला भांडाफोड…
अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…
नाशिक! बड्या IT कंपनीत नोकरी द्यायचे, मग रिसॉर्टवर नेऊन करायचे अत्याचार…
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

