
कोल्हापूरमध्ये युवतींचे लैंगिक शोषणानंतर बनवले Video; मित्रानेच केला गेम…
कोल्हापूर: शाहिद सनदी याने 15 हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाल्यानंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद सनदी याने अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले होते. याच व्हिडीओचा वापर करून तो युवतींना ब्लॅकमेल करत होता. शिवाय, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यामुळे पिडीत मुलींनी पोलिसांकडे जाण्याचं धाडस केलं नाही. पण शाहिदच्या जवळच्या मित्राने सगळा कांड उघडकीस आणला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
संशयितांच्या जवळच्या मित्रालाच या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याने या प्रकरणाला वाचा फोडल्याची माहिती पुढे आली आहे. पीडितांपैकी एका युवतीने धाडसाने पुढे येत तक्रार दाखल केली. हुपरी शहरातील एका युवतीसोबत शाहिदचे प्रेमसंबंध होते आणि याच ओळखीचा गैरवापर करून त्याने इतर 8 ते 10 युवतींना आपल्या जाळ्यात ओढले होते. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, आरोपीने अशाच प्रकारे आणखी किती मुलींची फसवणूक केली आहे, याचा तपास आता वेगाने सुरू करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
संबंधित प्रकरणात काही लव जिहादचा अँगल आहे का? याचीही चौकशी केली जात आहे. अमरावतीच्या अयानप्रमाणे यालाही शिक्षा व्हावी, अशी मागणी आता केली जात आहे. घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अमरावती व्हिडीओकांड प्रकरणील आरोपीचा ‘गुरूमंत्र’ ठरलेला ‘आप वही हो ना?…
अमरावती प्रकरण! कोण जास्त मुली पटवणार लागली पैज अन् फुटलं बिंग…
अमरावतीत तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, आरोपीवर गुन्हा दाखल…
भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…
लग्नापूर्वी होणाऱ्या पत्नीला प्लॅटवर बोलावलं अन् लैंगिक शक्तीच्या गोळीनं गेला जीव…

