
अहमदनगर हादरलं! दारुड्याने संशयावरून पेटवले घर, तिघींचा होरपळून मृत्यू…
अहमदनगर: पिंपळगाव लांडगा येथे पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून दारुच्या नशेत पतीने हे कृत्य केले आहे. या कृत्यामुळे नगरसह परिसरामध्ये खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
सुनील लांडगे असे आरोपी पतीचे नाव आहे. सुनील याने पत्नी लीला आणि दोन मुलींना घरात कोंडले. त्यानंतर बाहेरून कुलूप लावून घरामध्ये पेट्रोल टाकत आग लावली. पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारले आहे. हा सर्व प्रकार सुनील याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी सुनील याच्या घराकडे धाव घेतली. मात्र घराला कुलूप लावलेले असल्यामुळे त्यांना काही मदत करता आली नाही आणि घरामध्ये कोंडलेल्या पत्नी आणि मुलींचा जागीच होरपळून मृत्यू झाला.
दरम्यान, नगर तालुका पोलिसांनी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेतले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुनील याने केलेल्या कृत्याची लगेचच पोलिसांना कबुली दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहे.
हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…
नवविवाहितेची आत्महत्यानंतर घरच पेटवलं, सासू-सासऱ्यांचा होरपळून मृत्यू…
कडाक्याच्या थंडीमुळे रुम हिटर लावला अन् 6 जणांचा होरपळून मृत्यू…
Video: कारखान्यात भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

