पुणे! मारण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली; बियर अन् सिगारेटची पार्टी केली अन् 4 तास हत्येचा थरार…

पुणे : पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरातील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून चाकूने गळा चिरून दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना तपासादरम्यान समोर आली आहे. अमनसिंग गचंड (वय १७) असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. आरोपींनी त्याला मारण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली आणि बियर अन् सिगारेटची पार्टी केली. अमनसिंग गचंड याच्या हत्येचा थरार तब्बल चार तास सुरू असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.

खेड शिवापूर परिसरातून बुधवारी दुपारी मुलाचा मृतदेह सापडला. आरोपी प्रथमेश आढळ आणि त्याच्या साथीदारांनी अमनसिंग गचंड याची हत्या केली आहे. खून करण्यापूर्वी आरोपींनी अमनसिंगला त्याची शेवटी इच्छा देखील विचारली. त्याने सिगारेट आणि बिअरची मागणी केली. त्यानंतर त्याला खड्डा खोदायला लावून त्यात पुरले. परत बाहेर काढून सर्जकिल ब्लेडने आणि कोयत्याने त्याचा गळा चिरून, डोके दगडाने ठेचले. खेड शिवापूर येथील मंदिराच्या डोंगर परिसरात तीन ते चार तास हा खुनी खेळ सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे.

Police-Book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतलं असून, त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. तर सोशल मिडीयावरती मुलीच्या नावावरून मेसेज करून अमनसिंग याला बोलावून घेणाऱ्या युवतीसह तब्बल अकरा जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश चिंधू आढळ (वय १९, रा. उत्तमनगर), नागेश बालाजी धबाले (वय १९, रा. शिवणे) या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. २९ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला आहे. दरम्यान, बुधवारी (ता. ७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमनसिंग याचा मृतदेह पोलिसांनी खेड शिवापूर परिसरातील डोंगरातून शोधून काढला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश आढळ आणि त्याच्या साथीदारांनी अतिशय थंड डोक्याने अमनसिंगचा काटा काढल्याचं प्रथमदशी दिसून येतं आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये अमनसिंग आणि प्रथमेश यांच्यात वाद झाले होते. अमनसिंग याने केलेल्या मारहाणीत प्रथमेशच्या हाताला गंभीर जखम झाली होती. त्यामुळे तो त्याच्यावर चिडून होता. हा प्रकार घडल्यानंतर अमनसिंग विश्रांतवाडी परिसरात राहण्यास आला होता. परंतु, तो कोठे राहतो, हे प्रथमेशला माहिती नव्हते. मात्र, अमनसिंग सतत इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असल्याचे प्रथमेशने पाहिले. तो वेगवेगळे स्टेटस ठेवत असे. हा प्रकार प्रथमेशच्या मनाला लागला होता. त्यातूनच त्याने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन अमनसिंग याला आपल्या परिसरात खेचून आणण्याची योजना तयार केली. त्यासाठी मैत्रिणीची मदत घेतली. तिला आरोपींनी सांगितले की, आम्ही अमनसिंगला फक्त धमकावणार आहोत. त्यामुळे तू आमच्यासाठी इन्स्टाग्रामवर त्याच्यासोबत मैत्री कर. अमनसिंग अलगद प्रथमेशने लावलेल्या सापळ्यात अडकला.

इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीच्या सांगण्यावरून २९ डिसेंबरच्या दिवशी अमनसिंग तिने सांगितलेल्या ठिकाणी तो दुचाकीवर आला. खेड शिवापूर येथील वर्तुमुख मंदिराच्या डोंगराचा तो परिसर. दोघांनी मंदिरात दर्शन घेतले. तेवढ्यात धबाले तेथे आला. तो अमनसिंगच्या खांद्यावर हात टाकून काही अंतर पुढे चालत गेल्यानंतर दुचाकीवर बसवून त्याला पुढील डोंगरात घेऊन गेला. तेथे अगोदरच प्रथमेश आढळ आणि त्याचे इतर साथीदार आलेले होते. प्रथमेश आणि त्याच्या साथीदारांनी अमनसिंगला शेवटची इच्छा काय? असे विचारले. त्या वेळी त्याने बिअर आणि सिगारेट मागितली. आरोपींनी बिअर, सिगारेट आणून त्याला दिली. त्यांनी अमनसिंगला स्वतःचा खड्डा खणायला लावला. त्याला खड्ड्यात पुरून टाकले. आरोपींच्या लक्षात आले त्यानंतर, आपण जर याला खड्ड्यात पुरले तर तो कदाचित बाहेर पडेल. त्यामुळे त्यांनी अमनसिंगला त्यातून बाहेर काढले. आरोपीपैकी एकाकडे सर्जकिल ब्लेड होते. त्याने अमनसिंगच्या गळ्यावर मारले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. परत, त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करून, डोके दगडाने ठेचले. अमनसिंग मेल्याची खात्री झाल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह त्याच खड्यात पुरून टाकून पळ काढला.

दरम्यान, अमनसिंग रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्याचा फोन तर लागत होता. पण, तो फोन उचलत जात नव्हता. त्याची आई अनिता यांनी सर्वत्र शोधाशोध केली. परंतु, त्याचा तपास लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आईने विश्रांतवाडी पोलिस ठाणे येथे तक्रार दिली. गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने समांतर तपास करीत असताना बेळगाव, कर्नाटक येथून मुख्य सूत्रधार प्रथमेश आढळ आणि त्याचा साथीदार या दोघांना आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत प्रथमेशने पूर्वीच्या वादातून अमनसिंगचा साथीदारांच्या मदतीने खून करून मृतदेह खेड शिवापूरच्या डोंगरात पुरल्याची कबुली दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…

पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…

Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…

पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…

पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!