
Viral News! शिक्षकाचं बेपत्ता झालेलं अख्ख कुटुंब सापडलं…
हिंगोली: हिंगोलीमधील शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह कारने प्रवास करत गणपतीनिमित्त गावी निघाले होते. मात्र, शिक्षकाचं अख्ख कुटुंब बेपत्ता होते आणि मोबाईल बंद होते.. नातेवाईकांकडून शोध सुरु केला होता. अखेर हे कुटुंब सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे सुखरूप सापडले आहे. त्यांच्याशी संपर्क झाल्याने कुटुंबाने आणि मित्रपरिवाराने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पुणे शहरातील गणपती मंडळांना ‘पोलिसकाका’कडून आवाहन…
हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेले ज्ञानेश्वर चव्हाण हे शिक्षक असून नोकरीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे राहतात. सोबत त्यांची पत्नी आणि दोन मुलंसुद्धा राहतात. गणपती सणाच्या निमित्ताने कारने प्रवास करत ज्ञानेश्वर चव्हाण यांची पत्नी आणि दोन मुले असे चौघेजण गावाकडे निघाले होते. परंतु, घरी पोहचले नाही. नातेवाईकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण झालेला नाही. त्यांचे मोबाईल बंद असून त्यांच्यासोबत कोणताही संपर्क होत नाही. त्यामुळे नातेवाईक काळजीत होते.
त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ न शकल्याने हिंगोली येथील त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती. त्यांनी तात्काळ शोधाशोध सुरू केली. चव्हाण यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार हिंगोलीहून त्यांच्या शोधासाठी निघाले होते आणि त्यांनी सर्व संभाव्य ठिकाणी चौकशी सुरू केली होती. सोशल मीडियावरही चव्हाण कुटुंब बेपत्ता झाल्याची बातमी वेगाने पसरली होती, ज्यामुळे अनेकजण चिंतेत होते.
चव्हाण कुटुंब सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा फोन पावसात भिजल्याने तो बंद होता असे कारण आता समोर आले आहे. आता ते सर्वजण सुरक्षित असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुणे! मनोज जरांगे यांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग…
नवविवाहित सुनेला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् काही वेळातचं संपवलं…
पुणे! गौतमची पाच दिवस मृत्यूशी झुंज; कुत्र्यावर दया अन् केसं-दाढी…
लातूर! सुटकेसमध्ये मृतावस्थेत आढळला युवतीचा मृतदेह…
एक प्रियकर अन् दोन मैत्रिणी! महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा…

