
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या नगरच्या मित्रांवर काळाचा घाला…
जळगाव: उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघालेल्या कारला चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात बुधवारी (ता. ७) मध्यरात्री भीषण अपघात झाला असून, तीन जणांचा मृत्यू झाला; तर चार जण गंभीर जखमी झाले. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडांना जोरदार धडक दिली. मृत युवकांमध्ये तुकाराम रामभाऊ अंभोरे (वय २७), शेखर रमेश दुरपते (वय ३१), घनश्याम रामहरी पिसोटे (वय ३०, सर्व रा. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
उज्जैन येथे दर्शनासाठी सात मित्रांचा ग्रुप जात होता. कारचालकाचे कन्नड घाटातील वळणावर नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाला, तर इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता, की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
या भीषण अपघातात कारमधील योगेश तुकाराम सोनवणे (वय २८), अक्षय शिवाजी गिरे (वय २५), ज्ञानेश्वर कांता मोडे (वय २४, रा.), तुषार रमेश घुगे (वय २६, सर्व रा. शेवगाव) हे चौघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सध्या जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. युवकांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राहुरी-शनीशिंगणापूर मार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू…
हृदयद्रावक! साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; शिक्षिकेचा जागीच मृत्यू…
सप्तशृंग गडावर निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात…
नाशिक! करोनात पतीचं निधन अन् महिलेचा अपघाती मृत्यू; 5 लेकरं…

