एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याबाबत मोठी माहिती समोर…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात प्रांजल खेवलकर तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ कारागृहात होते. नुकतीच त्यांची सुटका झाली आहे.

पुणे शहरातील खराडी परिसरात कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना २५ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे. दीड महिन्यांपेक्षा अधिक वेळ प्रांजल खेवलकर तुरुंगात होते. त्यामुळं त्यांना मिळालेला जामीन मोठा दिलासा होता. खेवलकर यांच्यासह इतर आरोपींना देखील जामीन मंजूर करण्यात आला होता.

खराडी भागातील एका पार्टीवर 27 जुलै रोजी पोलिसांनी छापा टाकला होता. त्या पार्टीत अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. त्या पार्टीत काही महिला देखील होत्या. त्या पार्टीमध्ये काही प्रमाणात अंमली पदार्थ देखील आढळले होते. दीड महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली होती. प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात बीडच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या वतीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर यांच्यावर आरोप केले होते.

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर…

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण! रोहिणी खडसे यांच्या पतीच्या अडचणीत वाढ…

प्रांजल खेवलकर याच्या फोनमध्ये मुलींचे १७७९ अश्लील व्हिडीओ अन् फोटो…

पुणे! प्रांजल खेवलकरांनी अनेकदा मुलींना बोलावले; रोहिणी खडसे म्हणाल्या…

प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल पोलिसांची कोर्टात स्फोटक माहिती; आक्षेपार्ह व्हिडिओ अन्…

पुणे रेव्ह पार्टीत जावयाला अटक, एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…

पुणे शहरातील लॉज मालकांना आणि लॉजवर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!