
प्रांजल खेवलकर याच्या फोनमध्ये मुलींचे १७७९ अश्लील व्हिडीओ अन् फोटो…
पुणे : पुणे येथील अमली पदार्थ पार्टीत अटकेत असलेले प्रांजल खेवलकर याच्या तपासात पोलिसांना धक्कादायक गोष्टी हाताला लागल्या आहेत. प्रांजल खेवलकर याच्या फोनमध्ये एक हिडन फोल्डर आढळले असून, त्या फोल्डरमध्ये मुलींचे १७७९ अश्लील व्हिडीओ आणि फोटो आहेत. खेवलकर यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीचे देखील अश्लील फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहे. मुलींना चित्रपटात काम मिळवून देतो, असे म्हणून खेवलकर मुलींना बोलवत असे, अशी सनसनाटी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुणे पोलिस आयुक्त यांना पत्रव्यवहार करत महिला आयोगाने काही सूचना केल्या होत्या. खेवलकर प्रकरणात पत्रही पाठवले होते. पोलिसांच्या चौकशीचा अहवाल महिला आयोगाला आज (गुरूवार) प्राप्त झाला आहे. या प्रकरणात प्रांजल खेवलकर, पोपटानी यांच्यासह इतर आरोपींना ताब्यात घेतले होते. अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्याचवेळी खेवलकर यांच्या घरातून मोबाईल जप्त केला होता. याच मोबाईलमध्ये अनेक मुलींसोबतचे आक्षेपार्ह चॅट, फोटो आणि व्हिडीओ पोलिसांना मिळाल्याचे रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
खेवलकर याच्या हिडन फोल्डरमधून महिलांचे नग्न अर्धनग्न फोटो हाती लागले आहेत. मोबाईल फोल्डरमध्ये २५२ व्हिडिओ आणि १४९७ फोटो आहेत. यात मुलींचे नग्न फोटो आहेत. मुलींना विवस्त्र करून, नशा देऊन लैंगिक अत्याचार केल्याचे दिसते. या व्हिडीओच्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करण्यात आले. मोलकरणीचे देखील अश्लिल फोटो मोबाईलमध्ये आहेत. केवळ मुंबई, पुणे, ठाणे येथूनच नाही तर परराज्यातील मुलींना बोलवून अत्याचार केले गेले, असे तपासात समोर आल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
खेवलकर याच्या मोबाईलमध्ये सात मुलींचे नंबर आयुष नावाने सेव्ह करण्यात आले होते. आयुष नावाचा माणूस खेवलकर याला युवती पुरवत करत होता. चित्रपटात काम देतो, असे प्रथम तो सांगत असे. वेश्या व्यवसायासाठी बळजबरीने वापर करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असेही चाकणकर म्हणाल्या. या प्रकरणात ३५० पेक्षा जास्त मुलींचा वापर केला आहे, असे अहवालातून समोर आले आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. तसेच मोबाईलमध्ये मिळालेल्या नग्र फोटो आणि व्हिडीओत अनेक वेळा प्रांजल खेवलकर दिसून येत आहेत, असेही चाकणकर यांनी सांगितले.
पुणे! प्रांजल खेवलकरांनी अनेकदा मुलींना बोलावले; रोहिणी खडसे म्हणाल्या…
प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल पोलिसांची कोर्टात स्फोटक माहिती; आक्षेपार्ह व्हिडिओ अन्…
पुणे रेव्ह पार्टीत जावयाला अटक, एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…
पुणे शहरातील लॉज मालकांना आणि लॉजवर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

