Video: पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने वाचवले दोन जीव!

पुणेः पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर यांनी प्रसंगावधान राखत ३ वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले आहेत. यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुणे मेट्रो रेल्ले प्रशासातर्फे या सुरक्षा रक्षकाचा सत्कार करण्यात आला आहे.

पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर यांनी प्रसंगावधान राखत तीन वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. 19 जानेवारी रोजी दुपारी 2:22 मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक 2 वरून एक 3 वर्षाचा मुलगा खेळताना रुळावर पडला. त्यावेळी कामावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने मुलाला ट्रॅक वर पडताना पहिले. पडणाऱ्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाची आई देखील रुळावर पडली. त्यावेळी प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक विकास बांगर यांनी फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर बटन वेळीच दाबले. त्यामुळे स्थानकाच्या दोन्ही दिशांनी वेगाने येणाऱ्या मेट्रो ट्रेन त्वरित थांबल्या.

यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ 30 मीटर इतके होते. मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा व त्याच्या आईला सुखरूप रित्या रुळांवरून बाहेर काढण्यात आले व परिवाराशी त्याची भेट करून देण्यात आली. सुरक्षारक्षक विकास बांगर यांच्या समयसूचकतेबद्दल आणि धाडसी कार्याबद्दल महा मेट्रोतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

सुरक्षारक्षक विकास बांगर यांच्या समयसूचकतेबद्दल आणि धाडसी कार्याबद्दल पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे (प्रशासन व जनसंपर्क), महाव्यवस्थापक सोमेश शर्मा (वित्त) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी स्थानक नियंत्रक व पुणे मेट्रोचे कर्मचारी उपस्थित होते.

Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…

Video: महिलेचा कॉन्स्टेबलमुळे वाचला महिलेचा जीव…

Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…

सुट्टीवर आलेल्या जवानाचा सख्ख्या भावानेच घेतला बळी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!