कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे तर…

पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरात दहशत माजवणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर देश सोडून पळाला आहे. निलेश घायवळ याने अहिल्यानगरचा खोटा पत्ता देत पळ काढला होता. पासपोर्ट विभागाने अहिल्यानगर पोलिसांनी व्हेरिफिक्शन निगेटिव्ह दिल्यानंतर ही पासपोर्ट दिल्याचा दावा केला आहे. पण, आता निलेश घायवळ याचे लोकेशन पुणे पोलिसांच्या हाती लागले आहे.

कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सध्या विदेशात असून त्यांचे लोकेशन लंडन आहे अशी माहिती मिळाली होती. मात्र, तो लंडनमधून नसून दुसऱ्याच ठिकाणी असल्याचे समजत आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलेश घायवळ सध्या स्विर्त्झंलंडमध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याला 90 दिवसांचा व्हिसा देखील मिळाला आहे. त्यामुळे आता निलेश घायवळला 90 दिवसानंतर अटक करणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.

निलेश घायवळ याला अहिल्यानगरच्या आयुक्तालयातून पासपोर्ट देण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे. त्याला मिळालेला पासपोर्ट आणि व्हिसा गुन्हेगारी रेकॉर्ड असताना कसा मिळाला? यावर पुणे पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. पासपोर्ट कधी, केव्हा, कसा मिळवला? यावर देखील चौकशी आणि कारवाई सुरू असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, निलेश घायवळ याच्या पासपोर्टबाबत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडून खुलासा करण्यात आला आहे. नमूद केलेल्या पत्त्यावर कोतवाली पोलिसांनी पडताळणी केली असता संपर्क होऊ शकला नाही आणि सदर पत्त्यावर मिळून आला नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सदरचे पासपोर्ट प्रकरण 16 तारखेला प्रतिकूल म्हणजेच “Not Available” रिमार्क करून पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयास पाठवले होते, अशी माहिती जिल्हा पोलिसांनी दिली होती.

गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आली समोर…

पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…

पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं…

पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…

Video : पुणे पोलिसांनी चालवला आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर…

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुंडांना डांबलं तुरुंगात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!