
पुणे! एका १४ मजली इमारतीला लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू…
पुणे (संदिप कद्रे): एका १४ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एका १५ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आग आटोक्यात आणणाऱ्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले. या आगीमध्ये संपूर्ण सदनिका जळाली असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
पुण्यातील उंड्री येथील जगदंबा भवन रोडवरील मार्वल आयडियल स्पेसिओ सोसायटीच्या १२व्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी आग लागली. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत एका मुलाचा मृत्यू झाला होता.
मार्वल आयडियल स्पेसिओ सोसायटीच्या १२व्या मजल्यावर दुपारी भीषण आग लागल्यानंतर इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेत बेडरुममध्येच होरपळून एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर दोन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पाच जण जखमी झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच अग्निशमन गाड्या आणि एक हायड्रॉलिक शिडी घटनास्थळी पाठवली होती. आग आटोक्यात आणत असतानाच फ्लॅटमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे दोन अग्निशमन दलाचे जवान आणि तीन रहिवासी जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीच्या १२ व्या मजल्यावरील घरातील स्वयंपाकघरातून आग सुरू झाली. त्यानंतर, दोन सिलिंडरचे स्फोट झाले, ज्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीत प्रवेश करण्यास अडथळा निर्माण झाला. शेजारीही आत अडकलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते. संपूर्ण फ्लॅटमध्ये फर्निचर असल्यामुळे आगीची तीव्रता जास्त होती. आग संपूर्ण फ्लॅटमध्ये पसरली होती. आम्हाला बेडरूममध्ये सुमारे १५ वर्षांचा एक मुलगा मृतावस्थेत आढळला. आम्ही शक्य तितक्या लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आगीच्या तीव्र उष्णतेमुळे कोणालाही वाचवणे अत्यंत कठीण होते. स्वयंपाकघर फ्लॅटच्या प्रवेशद्वाराजवळ होते आणि आम्ही फ्लॅटमध्ये प्रवेश करताच दुसऱ्या सिलिंडरचा स्फोट झाला.’
पुणे शहरात मध्यरात्री भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू…
पुणे शहरात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट झाल्याने पोलिसकाका जखमी…
पुणे! चहाच्या टपरीवर सिलिंडरचा स्फोट; अनाथ संतोष पहिल्याच दिवशी होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! मेडिकल कॉलेजला लागलेल्या भीषण आगीत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…
प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेलेला प्रियकराचा होरपळून मृत्यू…

