
तानाजी सावंत यांच्या मुलाचे चार्टर्ड फ्लाईट विमान हवेतूनच माघारी; 68 लाख रुपये खर्च…
पुणे: राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हे सोमवारी (ता. १०) पुणे विमानतळावरुन आपल्या मित्रांसोबत बँकॉकला रवाना झाले होते. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ऋषिराज सावंत कोणालाही न सांगता अचानक घरातून बाहेर पडले. त्यानंतर चार्टर्ड फ्लाईटने बँकॉकच्या दिशेने रवाना झाले. मात्र, ऋषिराज अचानक घरातून गायब झाल्याने त्यांचे अपहरण झाले असावे, असा संशय तानाजी सावंत यांना आला. यानंतर तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुणे पोलिस आयुक्तांना यांना फोन लावून सगळा प्रकार सांगितला. तोपर्यंत पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची बातमी समजली होती.
पुणे पोलिसांनी हायप्रोफाईल केस असल्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये ऋषिराज सावंत यांचा माग काढला. ऋषिराज सावंत यांचे बँकॉकला जाणारे विमान अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरवण्यात आले. हे विमान अंदमान-निकोबारपर्यंत पोहोचले होते. एटीसीने चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकाला विमान परत पुण्याला घेऊन येण्यास सांगण्यात आले. त्यामुळे हे चार्टर्ड प्लेन आधी चेन्नईला नेण्यात आले तिथून हे विमान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर दाखल झाले.
एका शक्तिशाली नेत्याच्या मुलाला शोधण्यासाठी पोलिस यंत्रणा किती जलद पद्धतीने काम करु शकते आणि वेळ पडल्यास विमान हवेतूनही माघारी फिरवू शकते, याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. तानाजी सावंत यांनी दुपारी साडेचार वाजता आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली अन् पुणे पोलिसांनी अक्षरश: वाऱ्याच्या वेगाने काम करत ऋषिराज सावंत यांचा माग काढला. ऋषिराज सावंत बँकॉकच्या विमानात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी लोहगाव विमानतळ प्रशासनाशी बोलून अवघ्या पाच तासांमध्ये चार्टर्ड प्लेन माघारी आणले.
ऋषिराज सावंत यांनी या बँकॉकच्या वारीसाठी तब्बल 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, ‘ऋषिराज आणि माझ्यात कोणताही वाद झाला नाही. आम्ही रात्री गप्पा मारल्या. प्रदोष असल्यामुळे पहाटे ऋषिराजने रुद्राभिषेक केला. त्यानंतर आम्ही आपापल्या कामाला गेलो. ऋषिराज आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेला होता. मग तो अचानक पुन्हा बँकॉकला कसा केला, हा प्रश्न मला पडला होता. दिवसातून आमचे अनेकदा फोनवर बोलणे होते. मग हा एअरपोर्टला अचानक का गेला, हे मला समजत नव्हते. त्यामुळे आम्ही काळजीत होतो. त्याच्यासोबत त्याचे मित्र होते. पण पप्पा रागवतील का, या भीतीने त्याने मला काही सांगितले नाही का, हे आता त्याच्या बोलल्यानंतर कळेल.’
राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात ट्विस्ट…
थरारक! चिमुकल्याची अपहरणानंतर सुटका; पोलिसांनी शेतातून काढली आरोपींची वरात…
संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…
पुणे जिल्ह्यातील डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न…
पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

