पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन् समोर पाहताच…

मुंबईः वसईच्या एव्हरशाईन सिटी येथील मंगल वंदन सोसायटीतील एाका घराचा दरवाजा 15 दिवसांपासून बंद होता. घरमालकाने पोलिसांना बोलावून ड्युप्लिकेट चावीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच बहिण-भावाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कर्जबाजारीपणाला कंटाळून पंधरा दिवसापूर्वीच बहीण-भावाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हनुमंता श्रीधर प्रसाद (वय 40) आणि यमुना श्रीधर प्रसाद (वय 45) अशी मृतांची नावे आहेत.

हनुमंता श्रीधर प्रसाद आणि यमुना श्रीधर प्रसाद हे वसईच्या एव्हरशाईन सिटी येथील मंगल वंदन सोसायटीत राहात होते. दोघे ही कर्जबाजारी झाले होते. त्यांच्यावर 25 लाखांचे कर्ज होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून दोघा बहीण भावानी राहत्या घरात बेडरुममध्ये विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. गेल्या पंधरा दिवसापासून घराचे दार न उघडल्याने तसेच घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने सोमवारी दुपारी 112 नंबरवर कॉल करुन पोलिसांना बोलावून घेतले. यावेळी पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीच्या सहाय्याने घरात प्रवेश केल्यानंतर दोघा बहिण भावांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आले.

दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या आचोळे पोलिसांनी मृत्यूचा गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसकन्या संस्कृतीच्या हत्येचं गूढ 10 दिवसानंतरही कायम…

तानाजी सावंत यांच्या मुलाचे चार्टर्ड फ्लाईट विमान हवेतूनच माघारी; 68 लाख रुपये खर्च…

हृदयद्रावक Video! बहिणीच्या लग्नात नाचताना युवतीचा मृत्यू…

श्रद्धा वालकर हिच्या वडिलांचाही श्वास थांबला; अखेरची इच्छा राहिली अधुरी…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!