पुणे शहरात भरचौकात गाडी आडवी लावून तलवारीने कापला केक अन्…

पुणेः पुणे शहरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली असतानाच आता सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. एका टोळक्याने भरचौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने केक कापला आणि धिंगाणा घातला आहे. बुधवारी (ता. 21) मध्यरात्री ही घटना घडली असून, परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

पुणे शहरातील विविध भागांमध्ये काही दिवसांपासून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. रहिवासी वस्तीत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक फटाक्यांची आतषबाजी करुन, रस्त्याच्या मधोमध तलवारीने केक कापून वाढदिवसाचे सेलिब्रेशन साजरे केले जाते. गल्लीबोळातील कथित भाईंकडून असे प्रकार वारंवार घडतात. अशाप्रकारे वाढदिवस साजरे केले जाऊ नये यासाठी पोलिसांकडून वारंवार बजावण्यात देखील आले आहे. तरीदेखील सर्रास याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान तलवारीने केक कापणे इंदापूरच्या एका युवकाच्या अंगलट आले होते. फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती. त्याच्यावर इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून सचिन सातव याला अटक केली होती.

दरम्यान, पुण्यातील तळजाई परिसरात मंगळवारी (ता. 20) पहाटे 30 गाड्या फोडण्यात आल्या आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या भागातील वाघमारे आणि त्याच्या टोळीने या वाहनांची तोडफोड केली. या टोळीचे तीन हत्ती चौकात आधी विरोधी टोळीसोबत भांडण झाले. त्यानंतर वाघमारे आणि टोळीतील युवकांनी सहकारनगर भागातआणखी वाहनांची तोडफोड केली होती. सकाळी पोलिसांनी वाघमारे याला पकडले आणि त्याची धिंड काढली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!