आईस्क्रिममधील ‘त्या’ बोटाबाबत मोठा अहवाल आला समोर…

मुंबई : मुंबईच्या मालाडमध्ये महिलेला आईस्क्रिम खात असताना माणसाचे कापलेले बोट सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात ते बोट आईस्क्रीम कंपनीच्या कर्मचाऱ्याचे असल्याचे समजले होते. पण, आता या बोटाबाबतचा मोठा अहवाल समोर आला आहे.

मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने झेप्टो ॲपद्वारे यम्मो कंपनीच्या 3 आईस्क्रीम ऑर्डर केली होती. या कुटुंबातील एका महिला बटरस्कॉच आईस्क्रीम खात असताना मांसाच्या तुकड्यासारखं काहीतरी वाटले. आइस्क्रीमकडे पाहिले तेव्हा तिला त्यात मानवी बोट दिसले. सुमारे 2 सेमी लांबीचा मानवी बोटाचा तुकडा हे पाहून महिलेला धक्का बसला.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

महिलेने तत्काळ आईस्क्रीम कंपनी yummo.icecream या इन्स्टाग्रामवरील पेजवर तक्रार नोंदवली आणि कंपनीच्या कस्टमर केअरलाही माहिती दिली. आईस्क्रीममध्ये एक खिळाही सापडला. महिलेने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. मालाड पोलिसांनी लगेचच आईस्क्रीम जप्त केली. मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध आयपीसी 272,273,336 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरात छापा टाकण्यात आला. मुंबई पोलिसांना पुणे फॅक्ट्रीमध्ये एक व्यक्ती जखमी असल्याची सापडली. या व्यक्तीच्या हाताला जखम झाली आहे. आईस्क्रिममधील ते बोट याच व्यक्तीचे असल्याचा संशय पोलिसांना आला होता.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर फॉर्च्युन डेअरीमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याचे नाव ओमकार पोटे (वय २४) आहे. ओमकार पोटे हा फॉर्च्युन डेअरीमध्ये एप्रिल 2024 पासून असिस्टंट पॅकिंग मॅनेजर म्हणून जॉईन झाला होता. इंदापूरच्या फॉर्च्युन डेअरीमध्ये 11 मे 2024 च्या सकाळी ओमकार पोटे पॅकिंग विभागात आईस्क्रीमचे पॅकिंग करत होता त्याचवेळी त्याच्या बोटाचा वरचा भाग तुटला. ओमकार पोटेचे बोट तुटल्यानंतर कंपनीने त्याच्यावर उपचारही केले, पण तुटलेल्या बोटाचा शोध घेतला नाही. पोलिसांनी व्यक्तीचे डीएनए आणि वैद्यकीय तपासणी केली. त्याचे ब्लड सॅम्पल सांताक्रुज फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवले. आईस्क्रीममध्ये कापलेल्या बोटाचा भाग मिळाला होता, तोही फॉरेन्सिक तपासासाठी पोलिसांनी पाठवला. आता त्या कर्मचाऱ्याचा ब्लड सॅम्पलचा रिपोर्ट समोर आला आहे.

मुंबई पोलिसांच्या मते, आईस्क्रिममध्ये मिळालेल्या बोटात रक्त नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या ब्लड सॅम्पलशी ते जुळवता आले नाही. आता पोलिसांना डीएनए अहवालाची प्रतीक्षा आहे. यातून ते बोट फॅक्ट्रीतील त्या कर्मचाऱ्याचे आहे की नाही हे स्पष्ट होईल. पण ब्लड रिपोर्टनुसार त्या कर्मचाऱ्याला कोणताही गंभीर आजार नाही. त्यामुळे आईस्क्रिममधील ते बोट त्याचे असल्यास ते ज्याने खाल्ले त्याला घाबरण्याची गरज नाही. त्याला कोणताही धोका नाही.

आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाबाबत पोलिसांकडून मोठा खुलासा…

Video: आईस्क्रीममध्ये बोटानंतर सापडली गोम…

मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाचे पुणे कनेक्शन; कंपनी म्हणाली…

मुंबईत महिलेला आईस्क्रीम खाताना कोनमध्ये सापडलं माणसाचं बोट…

बापरे! पाण्याच्या सीलबंद बाटलीत आढळली मेलेली पाल…

संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…

नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…

हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…

डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा…

मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!