नाशिकमध्ये क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत पोलिसांच्या ताब्यात…

नाशिकः नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट – १ने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी सध्या चालू असलेल्या IPL क्रिकेट मॅचवर बेटींग करणा-यांचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.

दिनांक २६/०३/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे श्रेणी पोउनि / रविंद्र बागुल यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आडगाव परिसरातील हॉटेल राजेशाही दरबार, औरंगाबाद रोड, नांदुरनाका नाशिक या हॉटेलच्या पाठीमागे उघडयावर बसून निशिकांत पगार नावाचा व्यक्ती हा सध्या चालू असलेल्या IPL २०२४ च्या चैन्नई सुपर किंग विरूध्द गुजरात टायटन या क्रिकेट सामन्याचे त्याचे कब्जातील मोबाईल फोनवर थेट प्रक्षेपण पाहून या खेळावर पैजा लावुन जुगार खेळुन सट्टा चालवित असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. सदरची माहिती श्रेणी पोउनि / रविंद्र बागुल यांनी वपोनि श्री. मधुकर कड यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी पोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / १०९ वाघमारे, पोहवा / १८८३ विशाल काठे, पोहवा / ३६७ प्रदिप म्हसदे, पोहवा / २२१ योगीराज गायकवाड, पोना / ३७७ प्रशांत मरकड, पोना / १९०० विशाल देवरे, पोअं/ २२७३ अमोल कोष्टी, पोअं / २२६० जगेश्वर बोरसे चालक पोहवा / १३१६ नाझीमखान पठाण यांनी हॉटेल राजेशाही दरबार, औरंगाबादरोड, नांदुरनाका नाशिक येथे सदर व्यक्तीस शिताफीने पकडून ताब्यात घेतले.

निशिकांत प्रभाकर पगार (वय ३७, रा. सदिच्छा नगर, इंदिरानगर नाशिक) यास ताब्यात घेवून त्यांचे कब्जातुन १८००० /- रुपये किंमतीचा बेटींग लावण्याकरीता वापरण्यात येणारा ०१ टॅब, ०२ मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्या विरुध्द आडगाव पोलिस ठाणे येथे पोहवा / १८८३ विशाल काठे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन गुन्हा दाखल केला करून गुन्हयातील मुद्देमाल पुढील कारवाईकामी आडगाव पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि / हेमंत तोडकर, श्रेणी पोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / १०९ वाघमारे, पोहवा / १८८३ विशाल काठे, पोहवा / ३६७ प्रदिप म्हसदे, पोहवा / २२१ योगीराज गायकवाड, पोना / ३७७ प्रशांत मरकड, पोना / १९०० विशाल देवरे, पोअं / २२७३ अमोल कोष्टी, पोअं / २२६० जगेश्वर बोरसे चालक पोहवा / १३१६ नाझीमखान पठाण यांनी केलेली आहे.

नाशिक पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसांसह एकाला केली अटक…

नाशिकमध्ये चॉपरसारखे शस्त्र बाळगणारे अल्पवयीन मुले ताब्यात…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…

अपहरण! नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र. १ची धडाकेबाज कामगिरी…

नाशिकमध्ये गुन्हे शाखा युनिट – १ची धडाकेबाज कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!