अपहरण! नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र. १ची धडाकेबाज कामगिरी…

नाशिकः नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र. १ने धडाकेबाज कामगिरी केली आहे. अपहरण करुन १२,००,०००/- रूपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीस जेरबंद केले असून, पुढील तपास करत आहेत.

बापु पुलाजवळ सुयोजीत गार्डन येथे ०४ / ०३ / २०२४ रोजी इरटीगा कार मध्ये फिर्यादी राजेशकुमार गुप्ता यांचे अनोळखी व्यक्तींनी पिस्टलचा धाक दाखवुन जीवे ठार मारण्याची धमकी देवून अपहरण करून फिर्यादींचे दोन एटीएमचा वापर करून बळजबरीने ३०,०००/- रू. काढून घेतले, तसेच फिर्यादीला धमकावून त्यांचे पत्नीकडून बारा लाखांची रक्कम खंडणी उकळून फिर्यादी यांना दुसऱ्या दिवशी देवास, मध्यप्रदेश येथे सोडले होते, त्यावरून म्हसरूळ पोलिस स्टेशन, गुरनं – ५४ / २०२४ भादविक ३६३, ३६४, ३८६, ३८७, ३९५ व आर्म अॅक्ट ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक पोलिस उपआयुक्त गुन्हेशाखा प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हेशाखा युनिट १ यांना वेळोवळी सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. सदर गुन्हयाचा गुन्हेशाखा युनिट क्र. १ कडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळावर भेट देवून गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला. सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना सपोनि / हेमंत तोडकर पोहवा / महेश साळुके, पोअमं / राहुल पालखेडे अशांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचे नाव निष्पन्न करून सदर गुन्हा हा तुषार खैरणार, अजय प्रसाद, आदित्य सोनवणे व त्यांचे साथीदार यांनी केला असल्याचे निष्पन्न करून सदरची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना दिली. दोन पथक तयार करून त्यांना आरोपी पकडण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले.

गुन्हे शाखा युनिट क्र. १ कडील सपोनि / हेमंत तोडकर यांचेसह पोहवा / महेश साळुंके, पो.ना/ मिलिंदसिंग परदेशी, पोअंम / विलास चारोस्कर, नितीन जगताप, अमोल कोष्ठी, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ तसेच श्रेणी पोउनि / रविंद्र बागुल यांचेसह पोहवा / विशाल काठे, प्रदीप म्हसदे, नाझीम पठाण, पोना / प्रशांत मरकड, विशाल देवरे असे दोन पथके तयार करून रवाना केले होते. सपोनि / हेमंत तोडकर व पथक यांनी अंबड लिंक रोड, दत्तमंदिराजवळ आदित्य एकनाथ सोनवणे (वय २४ वर्षे रा. म्हाडा कॉलनी, अंबड लिंकरोड, नाशिक) यास पकडुन त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन यामाहा कंपनीची मोपेड मो.सा., अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, दोन सोन्याच्या कानातील रिंगा, रोख रक्कम रुपये २९,५००/- रु. असा एकुण १,५९,०००/-रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

पोउनि / रविंद्र बागुल यांचे पथकाने आरोपी १) तुषार केवल खैरनार (वय २८ वर्षे, रा. रिध्दी सिध्दी अपार्ट, म्हसरूळ नाशिक), २) अजय सुजीत प्रसाद (वय २४ वर्षे रा. अंबड लिंकरोड, नाशिक) यांना म्हसरूळ लिंक रोड येथे सापळा लावून पकडले, त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना ताब्यातुन शेवरलेट कंपनीची कुझ कार, व्हीवो कंपनीचा मोबाईल फोन, अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण ३,८७,००० /- रूपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयामध्ये नमुद आरोपींकडून एकुण ६, १६,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीस पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असुन उर्वरीत पाहिजे आरोपीतांचा शोध घेवून अटक करत आहोत.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मधुकर कड, सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / विष्णु उगले, पोउनि / चेतन श्रीवंत, श्रेणीपोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / महेश साळुंके, प्रदीप म्हसदे, नाझीम पठाण, विशाल काठे, पो.ना / प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, पोअंम / विलास चारोस्कर, नितीन जगताप, अमोल कोष्ठी, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, राजेश राठोड, संदिप भांड, योगीराज गायकवाड, मपोअं/ अनुजा येलवे, चालक सपोउनि / किरण शिरसाठ, पोअंम / समाधान पवार अशांनी केलेली आहे. तसेच सदर गुन्हा उघड आणण्यासाठी तांत्रिक विश्लेषण शाखा सपोउनि / जाकिर मिझा, पोहवा / राणे, पोअंम / भुषण देवरे यांनी योग्य ते सहकार्य केले आहे.

नाशिकमध्ये गुन्हे शाखा युनिट – १ची धडाकेबाज कारवाई…

राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देऊ; नाशिक पोलिसांना धमकीचा फोन…

नाशिक शहरात युनिट १ची मोठी कामगिरी; अपहरणकर्त्यांची २४ तासांत सुटका…

नाशिकमध्ये पानटपरी चालकांवर विशेष मोहिम राबवून कारवाई…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!