चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीचे पीएसआय अन्नपूर्णा यांनी केले एन्काऊंटर…
बंगळूरू (कर्नाटक): हुबळी जिल्ह्यात पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचे रविवारी (ता. १३) एन्काऊंटर करण्यात आले आहे. आरोपीला अटक करून घेऊन जात असताना त्याने पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला. हे एन्काऊंटर एका महिला अधिकाऱ्याने केले असून, पीएसआय अन्नपूर्णा असे महिला अधिकाऱ्याचे […]
अधिक वाचा...धक्कादायक! खासगी बसमध्ये पोटच्या मुलांसमोर आईवर सामूहिक बलात्कार…
बंगळूरू: कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यात एका खासगी बसमध्ये महिलेवर तिच्या मुलांसमोर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दावणगेरे येथील हरपनहल्ली येथील उच्छंगीदुर्गा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पीडित महिला आपल्या मुलांसह बसने घरी परतत असताना ही घटना घडली आहे. पीडित […]
अधिक वाचा...पुणे शहरात चिमुकलीवर लॉजवर बलात्कार; आरोपीसह लॉज मालकही अटकेत…
पुणे : पुणे शहरात घरा शेजारीच राहणार्या एका व्यक्तीने 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीसह लॉजमालक आणि मॅनेजरला अटक केली आहे. पुणे शहरातील वारजे परिसरात ही घटना घडली आहे. वारेज परिसरात 10 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लॉजवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही […]
अधिक वाचा...पुणे! स्वारगेट प्रकरणातील पीडित युवतीचे पोलिसांवर गंभीर आरोप…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट प्रकरणातील पीडित युवतीने राज्याच्या सचिवांना पत्र लिहून पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये युवतीने आरोपी दत्ता गाडे याने माझ्यावर दोनवेळा बलात्कार केला. तिसऱ्यांदा त्याला आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करायचे होते, मात्र आपण विरोध केल्याने तो पळून गेला. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली तेव्हा आपली इच्छा नसताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली वैद्यकीय चाचणी केली. […]
अधिक वाचा...पुणे! IT इंजिनिअर युवतीवर मित्रांनी केला सामूहिक अत्याचार अन्…
पुणे: पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका IT कंपनीत काम करणाऱ्या इंजिनिअर युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित युवतीच्या प्रियकराने आधी कारमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केला, यानंतर त्याने आपल्या काही मित्रांना फोन करून बोलावलं, यानंतर चारही जणांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी […]
अधिक वाचा...नागपुरात स्वारगेटची पुनरावृत्ती, बसचालकाचा प्रवासी युवतीवर अत्याचार…
नागपूर: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानक परिसरात प्रवासी युवतीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना नागपुरात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. एका बस चालकाने अकरावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. संदीप कदम (वय ४०) असे अटक केलेल्या आरोपीचे […]
अधिक वाचा...स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही…
लखनौ (उत्तर प्रदेश): स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे हे बलात्कार नाही तर लैंगिक छळाचे गंभीर गुन्हे आहे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे. बलात्काराचा प्रयत्न आणि गुन्ह्याची तयारी यातील फरक योग्यरित्या समजून घेतला पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती राम मनोहर मिश्रा यांनी कासगंजच्या पटियाली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत ही […]
अधिक वाचा...पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये युवतीवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच आणखी विद्येच्या माहेरघरात आणखी एक बलात्काराची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत ओळखीचा गैरफायदा घेत युवतीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये आरोपी सिद्धांत रणधीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवतीला आरोपी […]
अधिक वाचा...सहा विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; व्हिडिओ बनवला अन्…
अहमदाबाद (गुजरात): बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे सहा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर 16 महिने बलात्कार केला. एका आरोपीने मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या मित्रांनीही मुलीवर बलात्कार करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी 6 मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामधील एक मुलगा अल्पवयीन आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा आरोपींपैकी एक […]
अधिक वाचा...माजी मंत्र्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल; बलात्कार अन् गर्भपात…
ठाणे: काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ठाण्यातील एका उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या युवतीवर (वय २९) लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पृथ्वीराज […]
अधिक वाचा...
