Video: राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव…
पुणे : ताम्हिणी घाटात एक युवकाने धबधब्यात उडी मारली आणि वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्वप्नील धावडे असे या युवकाचे नाव असून, तो राष्ट्रीय खेळाडू होता. स्वप्निल हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला असताना घटना घडली आहे. स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्याच आधारे ते […]
अधिक वाचा...Video: …तर लोणावळा येथे अन्सारी कुटुंब बचावले असते
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागातील अन्सारी कुटुंब लोणावळ्याला रविवारी (ता. ३०) फिरण्यासाठी गेले होते. भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् त्यामध्ये 9 जण अडकले. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आले. मात्र एक महिला आणि चार मुले वाहून गेले. या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. पुण्यातील […]
अधिक वाचा...पुणे शहरात मोबाईल व लॅपटॉप चोरणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश…
पुणे : स्वारगेट एस.टी.स्टॅन्ड व पुणे परिसरामध्ये मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा स्वारगेट पोलिस स्टेशनकडील तपास पथकाने पदार्फाश करुन एकुण १३ लाख रुपये किंमतीचे १२० मोबाईल व ०३ लॅपटॉप असा मुद्देमाल स्वारगेट पोलिसांनी जप्त केला आहे. स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे […]
अधिक वाचा...Video: लग्नसमारंभासाठी आलेले अन्सारी कुटुंब लोणावळा येथे गेले अन्…
पुणे : लोणावळा येथील भुशी डॅम परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहे. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले आहेत. लोणावळ्यात 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: लोणावळा येथील भुशी डॅमवर कुटुंब गेलं वाहून…
पुणे : पुणे शहरातील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर आले होते. भुशी धरण परिसरात असलेल्या रेल्वे वॉटर फॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले. सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या शक्तीसमोर त्यांचा टीकाव लागू शकला नाही. आणि एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. त्यातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश […]
अधिक वाचा...नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) नितीन जगताप हे पुणे शहर पोलिस खात्यामध्ये गेल्या २९ वर्षांपासून कार्यरत आहेत. गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. गुन्हे शाखेमध्ये काम करताना त्यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले आहे. शिवाय, लहानपणापासून संगीत क्षेत्राची असलेली आवड त्यांनी आजही तेवढीच जपली असून, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विशारद (गायन) ही पदवी मिळवली आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरात पालखी दरम्यान वाहतूकीत बदल; पाहा पर्यायी मार्ग…
पुणे : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवार (ता. ३०) पुणे शहरात आगमन होणार असून मुक्कामही असणार आहे. या सोहळ्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते रविवारी दुपारनंतर आवश्यकतेनुसार वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड इथून रविवारी […]
अधिक वाचा...पुणे शहरात पालखी सोहळ्यासाठी पाच हजार पोलिस तैनात…
पुणे: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (ता. ३०) पुणे शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी वारकरी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही, वॉच टॉवर राहणार असून गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथके गस्त […]
अधिक वाचा...पुणे शहरात महिलांना लक्ष करून लुटणाऱ्या सराईत महिलेसह एकाला अटक…
पुणे (संदिप कद्रे): घरकाम करणाऱ्या महिलांना लक्ष करून त्यांना काम देण्याचे बहाण्याने चहा मधून गुंगीचे औषध देवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार महिलेस व तिच्या साथीदारास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सदरबाबत अधिक माहिती अशी की, १२ / ०६ / २०२४ रोजी दुपारी १२.३० वा ते रात्री १०.३० वा चे दरम्यान एका अनोळखी महिलेने भारत ज्योती बसस्टॉप […]
अधिक वाचा...बारामतीत बैलावरून वाद! गोळीबारातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू…
बारामती : बारामती तालुक्यात शर्यतीचा बैल खरेदीकरण्याच्या वादातून निंबुत येथे गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. बारामतीच्या निंबुत गावात गोळीबार झाल्याची […]
अधिक वाचा...
