धक्कादायक! नवविवाहीत पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नाही म्हणून…

पुणेः नवविवाहीत पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नसल्याच्या कारणावरून व तिचे विवाह बाह्य संबंध असल्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने पत्नीला देहू येथील घाटावर फिरायला नेत तिची ओढणीच्या साह्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. दोन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह […]

अधिक वाचा...

Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे : पुणे शहरातील एफसी रोडवर असणाऱ्या एका पबमध्ये काही युवक अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने कारवाई करत पब सील करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, दोन पोलिस कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा...

रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) रेश्मा पाटील या गेल्या १६ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म. गावातील वस्तीवर घर. शाळेत जाण्यासाठी साडेतीन किलोमीटर चालत जावे लागे. दररोज किमान सात किलोमीटर चालणे. शाळेत असताना खेळाची आवड निर्माण झाली आणि धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळू लागला. राष्ट्रीय आणि राज्य पातळी सुवर्णपदकासह विविध पुरस्कार मिळविले आहेत. खेळामुळे […]

अधिक वाचा...

भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; आमदार म्हणतात…

पुणे : अजित पवार गटाचे खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयुर मोहिते याने फॉर्च्युनर कारने मंचरजवळ शनिवारी (ता. २२) रात्री दुचाकीस्वाराला चिरडले असून, या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं […]

अधिक वाचा...

पुणे शहरात कोयता गँगने धुमाकूळ घालत केली वाहनांची तोडफोड…

पुणे : पुणे शहरातील वडगाव शेरी परिसरातील गणेश नगरमध्ये कोयता गँगने 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली. 6 कार, 4 रिक्षा, 3 दुचाकी आणि इतर वाहनांचे नुकसान झाले आहे. गुंडाने धुमाकूळ घालत कोयते आणि दगडांनी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वडगावशेरीच्या गणेशनगर परिसरात शुक्रवारी (ता. २१) कोयता गँगने धुमाकूळ घालत […]

अधिक वाचा...

बकोरी डोंगराजवळील दारु अड्डा गुन्हे शाखाकडून उध्वस्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या बकोरी डोंगराजवळील दारु अड्डा गुन्हे शाखाकडून उध्वस्त करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश यांचे सुचनेप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीमध्ये २१/०६/२०२४ रोजी अवैध धंदे प्रतिबंधात्मक कारवाई कामी पेट्रोलिंग करीत होते. युनिटकडील पोलिस अंमलदार रमेश मेमाणे व नितीन धाडगे यांना बातमी मिळाली […]

अधिक वाचा...

पुणे शहरात भानामती करीत असल्याचे संशयावरून लाखो रुपयांची सुपारी; तिघांना अटक…

पुणे (संदिप कद्रे): भानामती करीत असल्याचे संशयावरून वयोवृध्द व्यक्तीस जिवे ठार मारण्याचा कट रचुन त्यांचे गळयावर चाकूने वार करून पसार झालेल्या अनोळखी आरोपींचा कसलाही पुरावा नसताना माग काढून जेरबंद करण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी यांना १५/०६/२०२४ रोजी रांका ज्वेलर्स मागे पद्मावती पुणे यांना पुणे सातारा रोडवरील रांका ज्वेलर्स शेजारील फिश मार्केट समोरील फुटपाथवर […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल याला जामीन; पण…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल याला एका गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे. पण, आणखी दोन गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याने आरोपी विशाल अगरवाल याचा मुक्काम कारागृहातच राहणार आहे. पुणे शहरातील कल्याणी नगर चौकात 19 मे रोजी भरधाव येणाऱ्या पोर्शे कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू […]

अधिक वाचा...

युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…

पुणे : सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगून मनी लाँड्रिंग प्रकरणातील नरेश गोयल गुन्ह्यात सहभाग असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका युवतीची दोन लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. संबंधित प्रकार 7 मे 2024 ते 19 जून 2024 या कालावधीत घडला आहे. मगरपट्टा येथे राहणाऱ्या युवतीने (वय २६) बुधवारी (ता.19) हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली […]

अधिक वाचा...

पुणे शहरात रिलसाठी जीवघेणा स्टंट करणाऱ्यांची नावे आली समोर…

पुणे : पुणे शहरात रिलसाठी जीवघेणा स्टंट करणारे युवक आणि युवतीचे नाव समोर आले असून, या दोघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि पोलिसांचे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. युवकाचे नाव मिहीर गांधी तर युवतीचे नाव मीनाक्षी साळुंखे असे आहे. रील व्हायरल झाल्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली आहे. रील का […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!