कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाहा दुचाकींचे क्रमांक…

पुणे (संदिप कद्रे): ‘जॉय रायडिंगसाठी मोटार सायकल चोरी करणा-या विधी. बालक व आरोपी यांच्याकडून ०९ मोटार सायकली जप्त करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर व पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, व त्यांचे पथक पेट्रोलींग करीत असताना पोलिस अंमलदार राहुल थोरात, सुहास मोरे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन जण हे खडी मशीन चौक ते उंन्ड्री चौक दरम्यान असणा-या धमार्वत पेट्रोल पंपाच्या गल्लीत काळे व निळे रंगाची पॅशन प्लस मोटार सायकल घेवुन उभे आहेत. त्याच्याकडील मोटार सायकलला नंबर प्लेट नाही. सदर मोटार सायकल चोरीची असल्याबाबत संशय आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने नमुद ठिकाणी कोंढवा पोलिस ठाणे कडील तपास पथक स्टाफ शोध घेणकामी गेला असता त्याठिकाणी दोन इसम हे त्याच्याकडील बंद पडलेली विना नंबर प्लेट मोटार सायकल चालू करीत होते. मोटार सायकल चोरीची असल्याचा संशय वाटल्याने त्यांना ०७/०८/२०२४रोजी ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता ते उडवाडवीचे उत्तरे देवू लागले. पोलिस ठाणेस आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याच्या ताब्यात मिळुन आलेली पॅशन मोटार सायकल ही काकडे पॅलेस कर्वेनगर येथुन चोरी केली असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी
१) केटीएम २०० डुक मोटार सायकल क्रं. एम. एच. १२ के. के. ०३०८,
२) अॅक्टिव्हा मोटार सायकल क्रं.एम.एच.१३सी.एफ. ०६५८,
३) अॅक्टिव्हा मोटार सायकल क्रं. एम. एच. १२ एम.एच.२८७०,
४) अॅक्टिव्हा मोटार सायकल क्रं.एम.एच.१२टी.ई. ९४३२,
५) पॅशन प्रो. मोटार सायकल क्रं. एम.एच.१२जे. डी. ५०१८,
६) डिओ मोटार सायकल क्रं.एम.एच.१२ इ. झेड. ११९२,
७) अॅक्सेस मोटार सायकल क्रं. एम. एच. १२ यु.ई. ३६२९,
८) स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल क्रं.एम.एच.१२ जे. डब्ल्यु. २८८१

आरोपी आकाश दिपक धनवटे (वय १९ वर्षे, रा. लोहगाव गुरुव्दारा कॉलनी लेन नं. १०, ता. हवेली जि. पुणे) याने दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. सदर गुन्हे हे विधी बालक यांनी मौजेसाठी चोरी केल्याचे उघड झाले आहे. विधी बालक व आरोपी यांच्याकडुन विमानगर पोलिस ठाणे कडील एकुण ०३, कोंढवा पोलिस ठाणे कडील ०४, वारजे माळवाडी पोलिस ठाणे कडील ०१, लोणीकंद पोलिस ठाणे कडील ०१ असे एकुण ०९ गुन्हे उघड होवुन ३,६०,०००/- रु कि मो.सा. जप्त करण्यात आलेल्या आहेत.

संबंधित कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेशकुमार, रंजन शर्मा, सह पोलिस आयुक्त, मनोज पाटील, पुर्वे प्रादेशिक विभाग, आर. राजा, पोलिस उप आयुक्त परि. ०५, धंन्यकुमार गोडसे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोउपनिरी बालाजी डिंगोळे, अंमलदार अमोल हिरवे, सुहास मोरे, राहुल थोरात, अभिजीत जाधव, राहुल रासगे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, विकास मरगळे, मयुर मोरे, अक्षय शेंडगे, अनिल बनकर यांनी केली आहे.

पुणे शहरात गुंडाची हत्या; टोळक्याने पाठलाग करून ठेचलं…

पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…

कोंढवा पोलिसांनी रिक्षा चोरणा-या सराईत चोरट्यास केली अटक

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक…

कोंढवा पोलिसांनी मोक्कामधील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!