एम. एम. गँगचा म्होरक्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे: पुणे पोलिसांना दोन महिन्यांपासून गुंगारा देणारा एम. एम. गँगचा म्होरक्या व मोक्क्यातील फरार आरोपी मंगेश अनिल माने उर्फ मंग्या (वय २६ वर्षे, रा. सरगम चाळ, अप्पर बिबवेवाडी, पुणे) याला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फिर्यादी रोहित अशोक खंडाळे (वय २४, रा स.नं. ५९, गल्ली नं ०४, शिवछत्रपती शाळे जवळ, कोंढवा बु., पुणे हे साईनगर गल्ली […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…

बुलढाणाः समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे. समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी भीषण बस अपघात झाला. बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल […]

अधिक वाचा...

जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची हत्या…

पुणेः जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे  यांची जमिनीच्या वादातून अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली असून, हत्येनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानसरे यांचा काही लोकांशी जमिनीचा वाद सुरु होता. या कारणावरुन शुक्रवारी (ता. 7) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील १४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

पुणे: पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील १४ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सोमवारी (ता. १९) रात्री जारी केले. पोलिस निरीक्षकाचे नाव आणि कंसात बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणेः – सुनील माने, वरिष्ठ निरीक्षक, विश्रामबाग (वरिष्ठ निरीक्षक, खडक) – अशोक इंदलकर, वरिष्ठ निरीक्षक स्वारगेट (वाहतूक शाखा), – संगीता जाधव, वरिष्ठ निरीक्षक, […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्तांनी केली सात जणांवर निलंबणाची कारवाई…

पुणे: पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सहकार नगर तोडफोड प्रकरणी निलंबनाची कारवाई केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलिस निरीक्षक मनोज शेंडगे आणि पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. सदाशिव पेठेत युवतीवर झालेल्या हल्ल्यानंतर सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस चौकीच्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांनी पुण्यातील सहकार नगर […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…

पुणे : पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या पोलिस शिपायाने घराच्या टेरेसवरील झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैभव दिलीप शिंदे (वय २९, रा. खेरे कॉलनी, लोहगाव) असे या पोलिस शिपायाचे नाव आहे. वैभव शिंदे यांच्या मागे आई, पत्नी कांचन, भाऊ विजय आणि चार वर्षाचा मुलगा आहे. वैभव शिंदे हे […]

अधिक वाचा...

हडपसर पोलिस स्टेशनची दोन महिन्यात दुसरी मोक्का अंतर्गत कारवाई…

पुणेः टोळी प्रमुख पंकज ऊर्फ पंक्या गोरख वाघमारे व त्याचे इतर ०४ साथीदार यांच्याविरूध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. हडपसर पोलिस स्टेशनची दोन महिन्यात दुसरी तर पुणे पोलिसांची नवीन वर्षात 15 वी मोका कारवाई आहे. १) पंकज ऊर्फ पंक्या गोरख वाघमारे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०४ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन फिर्यादी हे  २५/१२/२०२२ रोजी […]

अधिक वाचा...

पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप…

पाटणा (बिहार) : घरगुती वादातून पती आणि पत्नीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मुजफ्फरपुरच्या फरदो पुल जवळ ही घटना घडली आहे. सकाळच्या सुमारात पती आणि पत्नीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. लालू छपरा […]

अधिक वाचा...

पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या…

पुणे (तेजस फडके): पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी दोन वर्ष कालावधी केलेला आहे, अशा अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणावरून बदला करण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक पदाच्या या बदल्या असून नारायणगाव पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांची बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये बदली करण्यात आली आहे. यवत पोलिस ठाण्यामध्ये असलेले केशव […]

अधिक वाचा...

Video: कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याला अनोखा पद्धतीने निरोप…

जयपूर (राजस्थान) : एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याला चक्क घोड्यावर बसवून, फुलांचे हार घालून निरोप देण्यात आला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डूंगरपुर जिल्ह्यातील ओबरी ठाण्याचे प्रभारी देंवेंद्र सिंह राव यांची उदयपूर जिल्ह्यात बदली झाल्यामुळे त्यांना घोड्यावर बसवून निरोप देण्यात आला. त्यांच्या गळ्यात फुलहार घालून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी चांगल्या पद्धतीने […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!