
पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप…
पाटणा (बिहार) : घरगुती वादातून पती आणि पत्नीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुजफ्फरपुरच्या फरदो पुल जवळ ही घटना घडली आहे. सकाळच्या सुमारात पती आणि पत्नीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
लालू छपरा येथील विक्रम कुमार सिंह आणि त्यांची पत्नी शबनम सिंह आपल्या 4 वर्षांच्या मुलासह राहत होते. दोन्ही पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. मंगळवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला होता. यामुळे पतीने गळफास घेत आत्महत्या केली. पतीने आत्महत्या केल्यावर पत्नीनेही लगेच गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे मुलाच्या डोक्यावरील छत्र हरपले आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मनोज कुमार यांनी दिली.